'रेस 3 ' पाठोपाठ बॉबी देओलला मिळाला 'हा' मोठा चित्रपट

  बॉलिवूड सुपरस्टार धर्मेद्र आणि त्यांची पत्नी हेमा मालिनि हे त्यांच्या काळात सुपरहीट होते. मात्र त्यांच्या इतके यश  पुढे त्यांच्या मुला- मुलींना मिळवता आले नाही. 

Updated: Jan 3, 2018, 08:19 AM IST
'रेस 3 ' पाठोपाठ बॉबी देओलला मिळाला 'हा' मोठा चित्रपट  title=

मुंबई :  बॉलिवूड सुपरस्टार धर्मेद्र आणि त्यांची पत्नी हेमा मालिनि हे त्यांच्या काळात सुपरहीट होते. मात्र त्यांच्या इतके यश  पुढे त्यांच्या मुला- मुलींना मिळवता आले नाही. 

बॉबी देओल  'सोल्जर','गुप्त','हमराज' अशा सुपरहीट सिनेमांचा भाग होता. मात्र त्यानंतर अनेक वर्ष बॉबी देओल बॉलिवूडपासून दूर होता.  मात्र आता लवकरच रूपेरी पडद्यावर बॉबी काही महत्त्वाचे प्रोजेक्ट घेऊन येणार आहे.  

सलमान सोबत करणार काम 

बॉबी देओल काही दिवसांपूर्वी ' रेस ३' या चित्रपटाचा भाग आहे याची घोषणा केली आहे. त्यानंतर नववर्षाच्या सुरूवातीलाच 'यमला पगला दीवाना ३' या चित्रपटाचा भाग झाला आहे.  

४ वर्षांनी पुनरागमन  

बॉबी देओल  गेली ४ वर्ष बॉलिवूडपासून दूर होता. काही चूकांमुळे बॉबी देओल हिंदी सिनेमापासून दूर होता. मात्र आता लवकरच सुपरस्टार सलमान खानसोबत 'रेस ३' मध्ये काम करणार आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्याला काम हवे आहे त्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती.  सध्या रेस ३ साठी तो बॉडी बनवत आहे.  

 

 

पोस्टर बॉईज  

श्रेयस तळपदे दिग्दर्शित ' पोस्टर बॉईज' या चित्रपटामध्येही बॉबी देओल प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाचे कौतुक झाले मात्र बॉक्सऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रेस 3' नंतर बॉबी देओल 'यमला पगला दिवाना' या सीरीजच्या तिसर्‍या  चित्रपटाचा  भाग  होणार आहे. या चित्रपटात सनी देओल आणि धर्मेंद्र देखील आहे.