Akshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा

Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. 

Updated: Dec 7, 2022, 10:32 AM IST
Akshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा title=
Bollywood Actor Akshay Kumar gets trolled for his look as Chhatrapati Shivaji Maharaj in vedat marathe veer daudale saat

Vedat Marathe Veer Daudle Saat​ : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. शिबवा आणि अक्षय कुमार? काही साम्य तर आहे का असे प्रश्नही अनेकांनीच विचारले. बरं, तेही पचवत तो या रुपात कसा दिसतो याची प्रतीक्षा केली. पण, आता ही प्रतीक्षा काही या मंडळींना फारशी फळलेली दिसत नाही. अक्षय कुमारनं नुकताच त्याच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातील फर्स्ट लूक  चाहत्यांच्या भेटीला आणला. सोशल मीडियाच्या माध्यमातून जय भवानी, जय शिवाजी! अशा जयघोष करत त्यानं हे रुप चाहत्यांसमोर सादर केलं. 

साजेसं पार्श्वसंगीत, योग्य वेशभूषा आणि केशभूषा असूनही त्याचा हा लूक मात्र चाहत्यांच्या पचनी पडला नाही. काहींनी आधी महाराजांसारखं चालायला शिक, नीट चाल असं म्हणत त्याला हिणवलं. तर, काहींनी टीझरमधील एक अशी गोष्ट हेरली, ज्यावरून आता खिलाडी कुमार आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम टिकेची धनी होताना दिसत आहे. 

अक्षया लूक फसला (akshay kumar gets trolled )

फर्स्ट लूकच्या निमत्तानं सादर करण्यात आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये अगदी शेवटी शेवटी खिलाडी कुमारचा महाराजांच्या रुपातील चेहरा जवळून पाहायला मिळतो. पण, त्याचवेळी लक्ष जातं ते म्हणजे त्याच्या बरेबर मागे, वरील बाजूस असणाऱ्या एका झुंबरकडे. साधारण शिवकालीन दिवसांमध्ये विद्युत रोषणाई वगैरे गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या. अशा वेळी दिवे, मशालींचा वापर सर्रास होत होता. पण, मग या चित्रपटात हा बल्ब असणारा झुंबर आलाच कसा? हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला. 

आईन्स्टाईन आधी की महाराज? नेटकऱ्यांना प्रश्न 

अल्बर्ट आईन्स्टाईन काय महाराजांच्या आधी जन्मला होता का? अशी प्रतिक्रियाही काही नेटकऱ्यांनी दिली. हे दृश्य किंवा चित्रपटाची पहिलीच झलक पाहिल्यानंतर इथं घेतलेल्यी Cinematic Liberty पाहता आता चित्रपटामध्ये आणखी काय काय पाहायला मिळणार? असा खोचक प्रश्नही काहींनी केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराजांच्या स्वराज्यासाठी जीव झोकून देणाऱ्या सात वीरांच्या शौर्यगाथेवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तेव्हा आता संमिश्र प्रतिक्रियांपासून सुरु झालेला हा प्रवास प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा टप्पा ओलांडणार की तिथंही अडखळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तूर्तास तुम्हाला या फर्स्ट लूकबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये कळवा.