जिच्या लग्नात गेला, तिचाच मार खाऊन परतला कार्तिक आर्यन; एकसारखा पाहिला जातोय Video

फार कमी वेळात कार्तिकनं हिंदी कलाजगतामध्ये कमाल लोकप्रियता मिळवली आहे. 

Updated: May 28, 2022, 01:46 PM IST
जिच्या लग्नात गेला, तिचाच मार खाऊन परतला कार्तिक आर्यन; एकसारखा पाहिला जातोय Video  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यन हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'भूल भूलैया 2 ' मुळे प्रकाशझोतात आला आहे. कार्तिकचा हा चित्रपट प्रेक्षकांनाही प्रचंड आवडला. फार कमी वेळात कार्तिकनं हिंदी कलाजगतामध्ये कमाल लोकप्रियता मिळवली. असंख्य तरुणींना कार्तिकनं वेड लावलं आहे. असा हा अभिनेता त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून नुकताच एका लग्नाला पोहोचला होता. (Bollywood Actor katrik aryan)

कार्तिक ज्या व्यक्तीच्या लग्नाला पोहोचला ती त्याच्यासाठी अतिशय खास. म्हणूनच की काय, लग्नाला गेल्यानंतर वधुकडूनच मार खाल्ल्यानंतरही कार्तिक तिला प्रेमानं घट्ट मिठी मारताना दिसला. 

कार्तिकनं नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केल्या. जिथं तो एक लग्नाला गेल्याचं दिसत आहे. कार्तिक ज्या व्यक्तीच्या लग्नाला गेला आहे, ती त्याची मॅनेजर असल्याचं कळत आहे. 

कामाच्या व्यापात व्यग्र असल्यामुळे कार्तिकला जान्हवीच्या लग्नाला वेळेत पोहोचता आलं नाही. ज्यामुळं तो तिच्यासोबत व्हिडीओ शूट करत असतानाच तिनं येत त्याला धपाटा मारला आणि लग्नासाठी तो उशिरानं आल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली. 

जान्हवी आणि कार्तिकचं हे गोड नातं त्याच्या व्हिडीओंतून पाहायला मिळालं. सेलिब्रिटी मंडळी मोठे होत असतानाच त्यांच्यासाठी काम करणारी आणि त्यांची अनेक कामं सुकर करणाही ही मंडळी मात्र अनेकदा पडद्याच्या मागेच राहतात. पण, कार्तिकनं त्याच्या या मॅनेजरलाही प्रकाशझोतात आणत तिच्या आनंदात त्यानं सर्वांनाच सहभागी होण्याची संधी दिली.