रणवीर चक्क लग्नसोहळ्यांत नाचणार; बुकींगसाठी संपर्क साधा....

दीपिकाने सांगितलं नेमका संपर्क साधावा तरी कुठे... 

Updated: Nov 1, 2019, 12:04 PM IST
रणवीर चक्क लग्नसोहळ्यांत नाचणार; बुकींगसाठी संपर्क साधा....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे हिंदी कलाविश्वातील मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल आहे. सोशल मीडियापासून रेड कार्पेटपर्यंत सर्वत्रच ही जोडी चाहत्यांचं आणि सेलिब्रिटी मंडळींचं लक्ष वेधत असते. अशी ही जोडी आता सोशल मीडियाचा वापर म्हणजे जाहिरातींसाठी करत आहे. 

रणवीर- दीपिका कोणा एका ब्रँडसाठी नवे तर, मोठ्या धमाल अंदाजात लग्नसोहळ्यांमध्ये कल्ला करण्यासाठी रणवीर ठेका धरणार असल्याचं म्हणत आहेत. खुद्द रणवीरनेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमधून हे सारंकाही लिहिलं आहे. 

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

फ्लॉरल प्रिंट असणाऱ्या निळ्या रंगाच्या एका शेरवानीतील फोटो पोस्ट करत रणवीरने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लग्नसराई आली आहे... लग्नसोहळ्यांमध्ये ठेका धरण्यासाठी मी सज्ज आहे... मनोरंजन करण्यासाठी सज्ज... लग्न, वाढदिवस आणि मुंडन या कार्यक्रमांसाठी सज्ज.' त्याचं हे कॅप्शन वाचून अनेक सेलिब्रिटी मित्रांनी रणवीरला प्रतिसाद दिला. अर्थात हे सारंकाही विनोदी अंदाजात सुरु होतं हे चाहत्यांच्याही लक्षात आलं. 

पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेसुद्धा रणवीरच्या या फोटोवर कमेंट करत त्याच्या या कार्यक्रमांसाठीची बुकींग करण्यासाठी सर्वांनी नेमका कुठे संपर्क साधावा याचीही माहिती दिली. दीपिका आणि रणवीरचा हा अंदाज पाहता खरंच आता कोणी या सेलिब्रिटींचा विनोदी अंदाज गांभीर्याने घेत त्यांना लग्नसोहळ्यासाठी आमंत्रित करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.