जीव ओवाळून टाकणाऱ्या Ex Girlfriend वर सलमान का करायचा इतकी चिडचीड ?

तशीच एक अडी या दोघांमध्येही होती.

Updated: Sep 30, 2022, 11:33 AM IST
जीव ओवाळून टाकणाऱ्या Ex Girlfriend वर सलमान का करायचा इतकी चिडचीड ? title=

Salman Khan and Katrina Kaif: बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती सेलिब्रेटी कपल्सची (Celebrity Couples). कोणाचा तरी एक्स - बॉयफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंड म्हणूनच आजकाल त्यांची ओळख जास्त असते. रिलेशनरिप्सच्य चर्चा काही कमी होत नाहीत. त्यातून लोकप्रिय बॉलीवूड कपल्सबद्दल (Bollywood Couples Latest News) जुन्याच गोष्टी नव्यानं चाहत्यांसमोर येत असतात. त्यातलीच एक गोष्ट आहे अशाच एका बॉलीवूड एक्स - कपलची. (Bollywood actor salman khan doesnt used to like katrina kaif wearing mini skirt)

हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून ते आहे सलमान खान आणि कतरिना कैफ (Salman Khan & Katrina Kaif). या दोघांच्या नात्याबद्दल तसं सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाही अनेकदा झाल्या. आपल्या ब्रेकअपनंतरही (Salman & Katrina Breakup) त्यांनी एकत्र सिनेमे (Salman Khan & Katrina Kaif Movies Together) केले. त्याच्या टायगर (Tiger), टायगर झिंदा हैं (Tiger Zinda Hai) अशा सिनेमांना तर फारच चांगली लोकप्रियता मिळाली. आता त्यांना टायगर 3 (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सलमान खान आणि कतरिना त्यांच्या ब्रेकअपनंतरही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे बोलले जाते परंतु ते दोघं रिलेशनशिपमध्ये असताना सलमान आणि कतरिनाचे अनेकदा वाद-विवादही व्हायचे. रिलेशनशिपमध्ये असताना आपल्या पार्टनरच्या अनेक गोष्टी आपल्याला आवडतात किंवा आवडत नाहीत. तशीच एक अडी या दोघांमध्येही होती. ती म्हणजे सलमान खानला आपली गर्लफ्रेंड कतरिनाची ही एक गोष्ट अजिबातच आवडायची नाही. 

सलमानला कतरिनानं मिनी स्कर्ट घातलेला आवडायचा नाही (Mini Skirt). ते पाहून त्याच्या रागही अनावर व्हायचा. कतरिनानं या गोष्टीबद्दल कधी तक्रार केली होती की नाही याबद्दल काही माहिती समोर नाही परंतु कतरिनाच्या या एका सवयीमुळे सलमान खान मात्र आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या गर्लफ्रेंडवर नेहमीच चिडचिड करायचा. 

आता लवकरच कतरिना आणि सलमानचा टायगर 3 (Tiger 3) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच कतरिनाचा फोन बूथ (Phone Bhoot) हा चित्रपटही यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.