...तर सलमानच्या कुटुंबाचा जावई झाला असता अर्जुन कपूर; नेमकं कुठे बिनसलं?

नात्यांची ही गुंतागुंत पाहून डोकं भणभणेल.   

Updated: Jul 4, 2022, 01:25 PM IST
...तर सलमानच्या कुटुंबाचा जावई झाला असता अर्जुन कपूर; नेमकं कुठे बिनसलं?  title=
Bollywood Actor Salman Khan sister Arpita Khan breakup reason with Arjun Kapoor

Arjun Kapoor and Arpita Khan Break Up: 'कितने अजीब रिश्ते है यहाँ पे'... या गाण्याच्या ओळी बॉलिवूडसाठी अचूक आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. इथं असणारी नात्यांची गुंतागुंत डोकं भणभणून सोडते. आता उदाहरणच घ्या, सलमान खानच्या बहिणीसोबत एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असणारा अभिनेता अर्जुन कपूर आज सलमानच्याच भावाच्या Ex Wife ला डेट करत आहे. 

थोडेसे गोंधळलात ना? एका मुलाखतीत वक्तव्य करताना खुद्द अर्जुननंच आपलं आतापर्यंतचं पहिलंवहिलं आणि गंभीर नातं, अर्पिता खान हिच्याशी होतं, असं सांगितलं. 

वयाच्या 18 व्या वर्षी ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले. दोन वर्षे हे नातं चाललं. 'मैंने प्यार क्यों किया' या चित्रपटाच्या वेळी त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. सलमानबाबत अर्जुनच्या मनात प्रचंड भीती होती. याच भीतीपोटी त्यानं संपूर्ण खान कुटुंबाला या नात्याची माहिती दिली. आपल्याला त्यांनी आधीपासूनच ओळखावं अशीच अर्जुनची इच्छा होती. 

सलमान कायमच लोकांची मनं, नाती जाणतो असं म्हणताना त्यानं कायम आपली बाजू घेतल्याची बाब अर्जुननं अधोरेखित केली. आपल्याच भल्यासाठी मी ब्रेकअपचं पाऊल उचलल्याचं अर्जुननं स्पष्ट केलं. 
 
काय म्हणाला अर्जुन?
'मी 140 किलो वजनाचा होतो. ''सलाम ए इश्क'' या चित्रपटाच्या वेळी मी निखिल अडवाणी याला असिस्ट करत होतो आणि माझी एक प्रेयसी होती. मी कायमच पार्टी करत असायचो आणि आपलं सगळं मस्त चाललंय अशाच विचारात असायचो. वयाच्या 22 व्या वर्षी मी चित्रपट दिग्दर्शित करेन, असं वाटत असतानाच आमचा ब्रेकअप झाला आणि मला भविष्याची चिंता वाटू लागली', असं तो म्हणाला. 

अर्पिताशी नातं तुटलं असतानाही अर्जुन सलमानसोबत दिसला होता. सलमाननं आपली मोठ्या भावाप्रमाणं साथ दिल्याचं अर्जुननं सांगितलं. कधी एकेकाळी अर्पिताशी नातं असणारा अर्जुन, जो खान कुटुंबाचा जावई होऊ शकला असता आज मात्र तो मलायकाला डेट करत आहे. 

काही वर्षांपूर्वी असणारी नाती आता पूर्णपणे बदलली आहेत. नात्यांमध्ये आता फक्त औपचारिकताच उरली आहे.