Video : ईssssw; आलियाची लिपस्टीक लावण्याची पद्धत पाहून सगळेच हैराण, रणबीरला येते 'या' गोष्टीची चीड

Alia Bhatt Video : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच आगामी चित्रपटांच्या तयारीतही दिसत आहे. असं असतानाच तिचा एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होतोय. 

सायली पाटील | Updated: Aug 16, 2023, 03:08 PM IST
Video : ईssssw; आलियाची लिपस्टीक लावण्याची पद्धत पाहून सगळेच हैराण, रणबीरला येते 'या' गोष्टीची चीड title=
Bollywood Actress Alia Bhatt shares weird way of applying lipstick video viral

Alia Bhatt Video Viral : अभिनेत्री आलिया भट्टनं फार कमी वयात कलाजगतात पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात तिनं पाहता पाहता सर्वोच्च शिखरही गाठलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही बड्या चित्रपटांमध्ये तिनं मध्यवर्ती भूमिका साकारल्या आणि तिच्या अभिनयाचीच वाहवा झाली. अशी ही आलिया आता एका मुलीची आई असून, एक यशस्वी अभिनेत्री आणि जबाबदार पत्नीही आहे. विविध भूमिका लिलया पेलणारी ही आलिया अनेक तरुणींची स्टाईल आयकॉन तर, तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी सौंदर्यवतीही आहे. पण, स्टाईलच्या बाबतीत आलियानंच गोंधळ घातला तर....? 

'हा काय प्रश्न झाला का?' असं म्हणत तुम्हीही ही बाब उधळून द्याल. पण, खरंच आलियाची एक स्टाईल टीप किंवा तिची पद्धत पाहून तुम्ही दचकाल. जर तुम्हाला मेकअपची आवड असेल तर, अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुम्ही ताडकन उडाल. Vogue Beauty Secrets interview मध्ये आलियानं लिपस्टीक  लावण्याची जगावेगळी पद्धत सर्वांसमोर आणली आहे. 

घाईगडबडीत पटकन मेकअप करण्यासाठीच्या व्हिडीओमध्ये तिनं हे MakeUp Hack दाखवलं आहे. जिथं ती तिच्या आवडीची लिपस्टीकही दाखवतेय. लग्नाच्या दिवसापासूनच आपल्याला ही लिपस्टीक आवडू लागलीये असं इथं ती सांगते. 

कशी lipstick लावते आलिया? 

आपण नेमके lipstick कशी लावतो याविषयी सांगताना आलिया म्हणतेय, 'मी ज्या पद्धतीनं lipstick लावते ते सामान्य नाही असं म्हटलं जातं. कारण हे विचित्रच आहे.'. इतकं म्हणून ती तिचे ओठ एका बाजूला वळवून त्यावर लिपकलर लावते आणि मग हातानं तो एकसारखा करते. जेणेकरुन lipstick व्यवस्थित दिसेल. ती नेमकं काय करते हे या व्हिडीओमध्ये पाहा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vogue (@voguemagazine)

आपण असं नेमकं का करतो हे सांगताना अनेकदा जेवताना मी लिपस्टीक टचअप करते अर्थात ती वारंवार लावते हे आलिया इथं सांगते. लिपस्टीक ओठांवर फिरवणं ओठ लिपस्टीकवर फिरवण्यापेक्षा कठीण आहे असंच मला वाटतं हे सांगताना तिलाही हसू आवरत नाही. आता इथं रणबीरचा उल्लेख करत तो अगदी प्रियकर असल्यापासूनच लिप्स्टीक पुसायला सांगतो, त्याला ही आवडतच नाही असंही तिनं सांगितलं. त्याला माझ्या ओठांचा नैसर्गिक रंग आवडतो असंच ती इथं सांगताना दिसते. 

हेसुद्धा वाचा : Video : समंथा खरोखरच 'त्याच्या' तालावर नाचली! दोघांच्या 'केमिस्ट्री'ने चाहते घायाळ; पण 'तो' आहे तरी कोण?

आलियाचा हा व्हिडीओ पाहताना तिची ही पद्धत अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. सहसा आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या अशाच लहानमोठ्या सवयींवरून चुकीचे समजतो. पण, यामागं असणारा त्यांचाय दृष्टीकोन नकळतच तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतो हेसुद्धा खरं. नाही का?