She said Yes! बॉलिवूड अभिनेत्रीकडून प्रियकराच्या प्रपोजलचा स्वीकार

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी 

Updated: Oct 13, 2019, 01:33 PM IST
She said Yes! बॉलिवूड अभिनेत्रीकडून प्रियकराच्या प्रपोजलचा स्वीकार title=

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये काही लहान पण तितक्याच उल्लेखनीय आणि लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टवरुन तिच्या आयुष्यातील काही सुरेख क्षण सर्वांसमोर आणले आहेत. 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून 'लारा' य़ा भूमिकेत झळकलेली ती अभिनेत्री आहे, एव्हलिन शर्मा. प्रियकराने आपल्याजवळ काही दिवसांपूर्वीच त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्याच्याच प्रेमाचा स्वीकार करत तिने या प्रपोजलला होकार दिला. 

आपल्या जीवनातील हा सर्वोत्तम दिवस असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. ही आनंदाची बातमी जाहीर करत तिने काही फोटोही पोस्ट केले. ज्यामध्ये एव्हलिनचा प्रियकर डॉ. तुषान भिंडी गुडघ्यांवर बसून मोठ्या फिल्मी अंदाजात तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हे प्रपोजल फार खास होतं, यामागचं कारण म्हणजे त्या क्षणासाठी निवड करण्यात आलेलं ठिकाण. 

सि़डनीतील हार्बर ब्रिज येथे तुषान आणि एव्हलिन यांच्या नात्याला एक वेगळं आणि तितकंच सुखावह वळण मिळालं. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना तिने आपला आनंद व्यक्त केला. 'तो क्षण जणू स्वप्नच सत्यात उतरत आहे.... अशी अनुभूती देणारा होता. तुषान मला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. त्याची प्रपोज करण्याती पद्धतही सर्वोत्तम होती', असं म्हणत त्याने आपल्यासाठी एका गिटारिस्टची सोय केली होती. ज्याने त्या क्षणाला सारी आवडीची गाणी वाजवत चार चाँद लावल्याचंही ती म्हणाली. 

 
 
 
 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

 
 
 
 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

अशी झाली पहिली भेट... 

तुषानसोबतची पहिली भेट कशी होती, याविषयी सांगत एव्हलिन म्हणाली, 'आम्ही एका ब्लाईंड डेटवर भेटलो होतो. मित्रमंडळींना तशी आखणी केली होती. मुळात तुषान हा माझ्याहूनही जास्त चित्रपटप्रेमी आहे.' य़ेत्या काळात आपण, लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा करणार असल्याचंही ती म्हणाली. तूर्तास एव्हलिन आणि तिचा प्रियकर, तुषान हे दोघंही या गोड क्षणांचा आनंद घेत आहेत.