Karishma Kapoor चा फोटो साठी किती तामझाम, कुणाला अवॉर्ड पकडायला लावलं तर कुणाला साडी...

या व्हिडिओतील करिश्माच्या लूकबद्दल बोलायचे तर ती खूपच सुंदर दिसत आहे

Updated: Mar 11, 2022, 02:50 PM IST
Karishma Kapoor चा फोटो साठी किती तामझाम, कुणाला अवॉर्ड पकडायला लावलं तर कुणाला साडी... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांशी सतत संपर्क राहण्यास प्रयत्न करतात. यासाठी कलाकार सिनेमांमधून संपर्कात असतातच. पण सोबतच वेगवेगळ्या कार्यक्रमांना देखील कलाकार उपस्थिती लावतात. अशीच उपस्थिती करिश्मा कपूरने एका कार्यक्रमात लावली होती. या कार्यक्रमातील तिचा व्हिडीओ सध्या सगळ्यांच लक्ष वेधत आहे. 

करिश्मा कपूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये फोटो आणि व्हिडीओसाठी खूप मेहनत घेत असल्याचं दिसत आहे.  करिश्मा एका फोटोसाठी इतका तामझाम करते की, हे पाहून तिचे चाहते स्तब्धच होतात. 

या कार्यक्रमात करिश्मा कपूरने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. अवॉर्ड घेतल्यानंतर पापाराझी तिला पोझ द्यायला सांगतात. पण करिश्माचा गोंधळ पाहून सगळेच थक्क होतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

करिश्मा एका व्यक्तीच्या हातात अवॉर्ड देते. तर एका मुलीला साडी नीट करायला सांगते. पण ती साडी सतत करिश्माला डिस्टर्ब करत असते. म्हणून करिश्माच लक्ष विचलित होत असतं. अखेर करिश्मा पापाराझीला पोझ देते. 

करिश्माचा सुंदर अंदाज

या व्हिडिओतील करिश्माच्या लूकबद्दल बोलायचे तर ती खूपच सुंदर दिसत आहे. तिची काळी साडी तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. यासोबत तिने कानात झुमके घातले आहेत आणि केसांनी बांधले आहे. अगदी कमी मेकअपमध्येही तिच्या चेहऱ्याची चमक सगळ्यांची मनं जिंकणार आहे.