आरारा खतरनाक! बोल्ड लूक शेअर करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस 

Updated: Jul 5, 2021, 04:17 PM IST
आरारा खतरनाक! बोल्ड लूक शेअर करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीवर खिळल्या सर्वांच्या नजरा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी अनेकदा चाहत्यांच्या भेटीला त्यांचे विविध लूक आणले आहेत. याच सेलिब्रिटी लूक्सच्या गर्दीमध्ये आता एका फोटोवरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आरारा खतरनाक, अशाच प्रतिक्रिया अनेकांनी देत या अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. 

आपल्या एका फोटोनं चाहत्यांच्या नजरा खिळवणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे किआरा अडवाणी (Kiara advani). सतत इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या किआरानं यावेळी तिचा बिकिनी लूक सर्वांसमोर आणला आहे. निळं आभाळ, सुडौल बांधा असणारी किआरा, त्यामध्ये तिची पिवळ्या रंगाची बिकिनी आणि पांढरा श्रग असा एकंदर लूक म्हणजे क्या बात. हा फोटो शेअर करताच काही वेळातच त्यावर फॉलोअर्सचे लाईक्स आणि कमेंट्स करण्यास सुरुवात केली होती. 

Virat Kohli आहे जगातील महागड्या वस्तूंचा मालक, जाणून घ्या घड्याळापासून प्रायवेट जेटची किंमत 

 

किआरा अडवाणीचं नाव मागील काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्याशी जोडलं जात आहे. सिद्धार्थ आणि किआरा यांना अनेकदा एकत्रही पाहिलं गेलं आहे. त्यामुळं त्यांच्यातील नात्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. पण, या दोघांपेकी एकानंही या नात्याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

'कबीर सिंग' या चित्रपटापासून किआराला विशेष यश मिळालं. अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबतच्या तिच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. या चित्रपटानं चांगलीच कमाईही केली होती.