Rakhi Sawant | राखी सावंतच्या स्ट्रगलची कहाणी आणि त्या कामाचा ५० रुपये मोबदला

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हे नेहमीच चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.   

Updated: Feb 9, 2022, 08:26 PM IST
Rakhi Sawant | राखी सावंतच्या स्ट्रगलची कहाणी आणि त्या कामाचा ५० रुपये मोबदला title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हे नेहमीच चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमी व्हीडिओ, फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचा एक सेपरेट चाहता वर्ग आहे. मात्र ती जे काही उलट सुलट करत असते. त्यामुळेच तिला 'ड्रामा' क्विन असं म्हंटलं जातं. तिच्या या सर्व प्रकारामुळे राखी म्हणजे एंटरटेन्मेंट आणि टाईमपास अशी तिची ओळख निर्माण झाली आहे. (bollywood actress rakhi sawant aka drama queen read struggle stroy of actress)

प्रत्येतकाचा आपला असा एक स्ट्रगल असतो, जो आपल्याला माहिती नसतो. राखी आज खोऱ्याने पैसे कमावते. मात्र तिला एकेकाळी अवघ्या काही रुपयांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. स्वत: राखीनेच याबाबत खुलासा केला आहे. याबाबत तुम्ही वाचून खरंच थक्क व्हाल. 

राखीचा खुलासा

राखीने काही वेळेपूर्वी मोठा खुलासा केला. फक्त अवघ्या 50 रुपयांसाठी एक काम करावं लागलं होतं. राखीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या लग्नात फक्त 50 रुपयांसाठी वाढपी (वेटर) काम केलं होतं. राखीने आर्थिक चणचणीमुळे असं करावं लागलं. त्यावेळेस राखीकडे स्वत:ची अशी विशेष अशी ओळख नव्हती तसेच पैसेही नव्हते.   

राखी बिग बॉसच्या घरात

राखीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं असं स्थान निर्माण केलंय. मात्र ती सध्या फिल्मपासून लांब आहे.  राखी अखेरच्या वेळेस बिग बॉसच्या 15 व्या मोसमात पती रितेशसोबत दिसली होती. मात्र त्यानंतर झालेल्या वादामुळे राखीला बिग बॉसमधून बाहेर पडावं लागलं होतं.