'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार सनी

'अडल्ट स्टार' ते 'बेबी डॉल' असा प्रवास करत सनी लिओनी हिने हिंदी कलाविश्वात तिची वेगळी ओळख प्रस्थापित केली.

Updated: Jan 29, 2019, 02:07 PM IST
'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार सनी  title=

मुंबई : 'अडल्ट स्टार' ते 'बेबी डॉल' असा प्रवास करत सनी लिओनी हिने हिंदी कलाविश्वात तिची वेगळी ओळख प्रस्थापित केली. रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालिकेच्या भूमिकेतही ती दिसली. बॉलिवूडमध्ये 'बेबी डॉल' म्हणून ओळखली जाणारी हीच सनी आता दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकण्यास सज्ज झाली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून ती दाक्षिणात्य सिनेजगतात झळकणार आहे. मुख्य म्हणजे सनीचं पदार्पण हे दणक्यात होण्याची चिन्हं आहेत. कारण, मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ममूटी यांच्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. 

माध्यमांमध्ये सध्या सनी आणि ममूटी यांच्या या चित्रपटाच्या सेटवरील फोटो बराच व्हायरल झाला आहे. शेअर होण्यापासून ते मीम्स होण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी चर्चा होतेय ती म्हणजे सनी, ममूटीच्याच फोटोची. 'मदुरा राजा' या आगामी चित्रपटातील एका गाण्यात सनी झळकणार असल्याचं कळत आहे. त्याशिवाय 'वीरमादेवी' आणि 'रंगीला' या चित्रपटांतूनही ती मल्याळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
 
 
 

A post shared by Aju Varghese (@ajuvarghese) on

उदय कृष्ण लिखित कथानकावर आधारित मदुरा राजा या चित्रपटाचं दिग्दर्शन वैशाख करत असून तो २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पोक्किरी राजा' या चित्रपटाचा सिक्वल असल्याचं कळत आहे. ज्यामध्ये ममूटी आणि पृथ्वीराज यांच्या मध्यवर्ती भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. 'मदुरा राजा'मध्ये ममूटी मुख्य भूमिकेत झळकणार असून, पृथ्वीराज यात पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसेल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. यामध्य़े ममूटी यांचा लूक प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. पाठमोरे उभे असणारे ममूटी, डाव्या बाजूने हलकीशी दिसणारी त्यांच्या चेहऱ्याची झलक आणि एकंदर लूक पाहता 'मदुरा राजा'विषयी कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

A post shared by Mammootty (@mammootty) on

केरळमध्ये असणारी सनीची लोकप्रियता पाहता मल्याळम चित्रपटांमध्ये तिच्या येण्याने इतर अभिनेत्रींना चांगलीच टक्कर मिळणार हेसुद्धा तितकच खरं. त्याहूनही सुरुवातीच्याल काळात एका नव्या चित्रपट विश्वात अग्रगणी कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणं हीसुद्धा एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी गोष्ट आहे.