Mallika Sherawat मल्लिका शेरावतने १० मिनिटाच्या भूमिकेसाठी दीड कोटी फी घेतली...

मल्लिकाचा प्रवास बॉलिवूडमध्ये इतका सोपा नव्हता

Updated: Apr 23, 2021, 10:27 PM IST
 Mallika Sherawat मल्लिका शेरावतने १० मिनिटाच्या भूमिकेसाठी दीड कोटी फी घेतली... title=

मुंबई : कपिल शर्माच्या शो मध्ये प्रमोशनसाठी आलेल्या मल्लिकाने एक विचित्र किस्सा शेअर केला होता . मल्लिकाने सांगितले की, चित्रपट निर्मात्याला तिचा हॉटनेस तपासण्यासाठी तिच्या पोटावर अंड फ्राय करायचं होतं. पण त्याची ही विचीत्र अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही कारण मल्लिकाने तसं करण्यास नकार दिला. मल्लिकाने आपला अनुभव ज्या पद्धतीने शेअर केला जे ऐकून मल्लिकाचा प्रवास बॉलिवूडमध्ये इतका सोपा नव्हता. चला, एक नजर टाकुयात तिच्या कारकीर्दीवर

हरियाणाची मल्लिका शेरावत
खूप कमी लोकांना माहित आहे की, सिनेमांमध्ये काम करण्यासाठी मल्लिका शेरावतने आपलं नाव बदललं होतं. तिचं खरं नाव रिमा लांबा आहे. कंगना व सुरवीनच्या कुटुंबीयांप्रमाणेच मल्लिकाचेही आई-वडिल तिच्या निर्णयावर नाखुश होते. सिनेसृष्टित येण्याचा आपला निर्णय मल्लिकाने घरात सांगताच तिला मारहाण केली जायची त्यामुळे तिने कुटुंबापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं एका मुलाखतीत सांगितले. असो, हल्लीचा जमाना आता बदलला आहे. आता आई-वडिल मुलांच्या निर्णयात साथच देत नाहीत तर त्यांच्या वाईट काळात खंबीरपणे त्यांची साथही देतात.

मल्लिकाचा घटस्फोट झाला आहे
मल्लिकाने २०१० मध्ये दिल्लीच्या करणसिंग गिलशी लग्न केले होतं. तो पायलट होता पण लग्नाच्या १ वर्षानंतर दोघेही विभक्त झाले. 2013 मध्ये मल्लिका शेरावतने टीव्हीवर 'बॅचलोरेट इंडिया' च्या कार्यक्रमात मल्लिकाशी लग्न केले होते. मात्र, हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही.

चित्रपटाआधी म्युझिक व्हिडिओत दिसली होती
मल्लिकाने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या आधी निर्मल पांडे यांच्या म्युझिक व्हिडिओ 'मार डाला' आणि सुरजीत बिंद्राकियाच्या व्हिडिओमध्ये 'लक तुनो'मध्ये दिसली होती. मल्लिकाने करिना कपूर-तुषार कपूर अभिनीत 'जीना सिर्फ मेरे लिए' या चित्रपटात सहाय्यक भूमिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली.

10 मिनिटांच्या रोलसाठी 1.5 कोटी रुपये
'मर्डर' आणि 'ख्वाहिश' नंतर मल्लिका शेरावतने तिची फी प्रचंड वाढवली होती. असं मानले जाते की, हिमेश रेशमियाच्या 'आप का सूरूर' या चित्रपटासाठी 10 मिनिटांच्या भूमिकेसाठी मल्लिकाने 1.5 कोटी रुपये घेतले होते

जॅकी चॅनबरोबर केली स्क्रिन शेअर
2007 मध्ये हाँगकाँगच्या मॅगजीनने मल्लिकाला आशियामधील सर्वात सुंदर 100 लोकांमध्ये स्थान दिलं. तिच्या हॉलिवूड चित्रपटाच्या कारकिर्दीत तिने इंटरनॅशनल स्टार जॅकी चॅनसोबत  'मिथ' या चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये तिची भूमिका एका भारतीय मुलीची होती जी एका नदीत जॅकी चॅनला वाचवते