बॉलिवूडमधील आव्हानांचा 'या' गायिकेकडून खुलासा

 'जुगनी जी' गाण्याच्या माध्यमातून रातोरात इन्टरनेट सेंसेशन ठरली.

Updated: Sep 27, 2019, 07:07 PM IST
बॉलिवूडमधील आव्हानांचा 'या' गायिकेकडून खुलासा title=

मुंबई : गायक कनिका कपूर संगीत विश्वातील प्रसिद्ध असं एक नाव आहे. परंतु हा बॉलिवूड प्रवास तिच्यासाठी फार कठिण होता. पण तिने कधी जिद्द सोडली नाही. २०१२ साली 'जुगनी जी' गाण्याच्या माध्यमातून रातोरात इन्टरनेट सेंसेशन ठरलेली कनिका त्यानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या यादीत सामील झाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.  'बेबी डॉल', 'लवली', 'छिल गए नैना' आणि 'देसी लुक' या गाण्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मने जिंकली. 

आयुष्यातील हे ध्येय गाठण्यासाठी तिला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. गाण्यात आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेल्या कनिकाला बॉलिवूडमध्ये कसं काम चालतं हे देखील ठाऊक नव्हतं. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने आलेल्या अनुभवांचा खुलासा केला. 

आपल्या अनुभवाबद्दल संवाद साधताना ती म्हणाली की, 'आयुष्यातील अनेक चढ-उतारानंतर मी बॉलिवूडमध्ये माझी ओळख निर्माण करू शकेल. अनेक संघर्षानंतर मी स्वत:साठी मार्ग तयार करू शकले. आता माझं ध्येय फक्त आणि फक्त संगीत आहे.' माझ्यासाठी हा प्रवास फार कठिण असल्याचे तिने सांगितले.   

१९९७ साली फक्त १८ वर्षांची असताना तिचं लग्न एका उद्योगपतीसोबत झालं होतं. लग्नानंतर ती लंडनमध्ये गेली आणि तिकडे तिने तीन मुलांना जन्म दिला. परंतु तिचं हे लग्न मात्र अपयशी ठरलं. पतीसोबत विभक्त झाल्यानंतर ती स्वप्नांच्या नगरीत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली.