कपूर कुटुबियांनंतर आता बॉलीवूडमध्ये 'या' कपलच्या घरी आला नवा पाहूणा... दिलं खास नावं

पण आता कपूर कुटुंबियांनंतर बॉलीवूडच्या एका नव्या कपलनं नव्या पाहूण्याचं स्वागत केलं आहे. 

Updated: Sep 26, 2022, 03:20 PM IST
कपूर कुटुबियांनंतर आता बॉलीवूडमध्ये 'या' कपलच्या घरी आला नवा पाहूणा... दिलं खास नावं  title=

Ali Abbas Zafar Baby: सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरी महिन्याभरापुर्वीच एक नवा पाहूणा आला आहे. वायू आनंद अहूजा (Vayu Anand Ahuja) असं सोनम कपूरच्या नव्या मुलाचं नावं आहे. सध्या बॉलीवूडमध्ये या नव्या पाहूण्याच्या येण्यानं आनंदोत्सव सुरू आहे. त्याचबरोबर कपुर कुटुंबियांच्या घरातही सध्या आनदांचे वातावरण आहे. पण आता कपूर कुटुंबियांनंतर बॉलीवूडच्या एका नव्या कपलनं नव्या पाहूण्याचं स्वागत केलं आहे. (bollywood director ali abbas zafar and his wife alicia zafar welcomes baby girl alija zahera zafar photos goes viral)

सोनम कपूरनंतर आता दिग्दर्शक अली अब्बास जफरही (Ali Abbas Zafar Becomes Father) वडील झाले आहेत. नुकताच त्यांचा 'जोगी' (Joggi) चित्रपट दिग्दर्शित झाला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. अलीची पत्नी एलिसिया (Alicia Zafar) हिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. अलीने सोशल मीडियावर ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अली अब्बास जफरने आपल्या इंस्टाग्रामवर पत्नी अ‍ॅलिसियाच्या बेबी बंपचा (Ali Zafar Shares Alicia Baby Bump Photo) एक फोटो शेअर केला असून 24 सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या मुलीचे स्वागत केले आहे. अली लिहितात की, "अॅलिसिया आणि मी आमच्या प्रेमाचा प्रवास सुरू केला आहे. आमची लव्ह स्टोरी ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही एकमेकांना भेटलो आणि आमचे लग्न झाले. आता जवळपास 2 वर्षांनंतर आम्हाला आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट मिळाली आहे. 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12:25 वाजता 'ती' आमच्या आयुष्यात आली. आमच्या या छोट्याशा आनंदाचे स्वागत करा - जिचं नावं आहे, अलीजा झाहरा जफर (Alija Zahera Zafar)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉलीवूड सेलिब्रेटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव - 
अली अब्बास जफरने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच सिनेसृष्टीतील त्यांच्या सेलिब्रिटी मित्रांनी त्यांचे अभिनंदनचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. अलीच्या पोस्टच्या खाली कमेंट करताना रणवीर सिंगपासून (Ranveer Singh) अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.