बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री नैराश्येतून जातेय, हे आहे कारण

 डेली पेमेंटवर असणाऱ्या कलाकारांना लॉकडाऊनचा फटका बसलाय

Updated: Jun 15, 2020, 09:16 AM IST
बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री नैराश्येतून जातेय, हे आहे कारण  title=

मुंबई : बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री या दिवसात नैराश्येतून जातेय. इंडस्ट्री कधी सुरु होईल ? आणि केव्हा उत्पन्न सुरु होईल ? याबद्दल सर्वांच्या मनात अनिश्चितता आहे. लॉकडाऊन दरम्यान तीन कथित आत्महत्यांनी बॉलीवूड हादरले. याच आठवड्यात सेलिब्रिटी मॅनेजर दिशाने चौदाव्या माळ्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. याआधी लॉकडाऊन दरम्यान दोन आत्महत्या झाल्या. अभिनेता मनमीत अग्रवाल आणि प्रेक्षा मेहता यांच्या आत्महत्येमागे देखील नैराश्य हे कारण मानले जातंय. डेली पेमेंटवर असणाऱ्या कलाकारांना लॉकडाऊनचा फटका बसलाय. यामध्ये कलाकार तसेच बॅकस्टेज कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

ग्लॅमर दुनियेशी संबंधित असलेल्यांची जीवनशैली महागडी बनलेली असते. लॉकडाऊनमध्ये हे सर्व खर्च पूर्ण न होत असल्याने अनेकांना नैराश्य येत असून त्यामुळे आत्महत्या होत असल्याचे काही प्रकरणांमध्ये समोर आलंय. आर्थिक आणि मानसिक तणावातून बॉलीवूड जातंय. CINTAA तर्फे वेबिनारच्या माध्यमातून यावर चर्चा होतेय. आर्थिक चणचण असलेल्यांना सहाय्य केलं जातंय. यांना मदत करण्याचे वारंवार आवाहन केलं जातंय. अनेक सेलिब्रिटी गरजुंना मदत पोहोचवत आहेत. पण एका मोठ्या योजनेची बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीला गरज आहे. 

यापेक्षा देखील वाईट वेळ येऊ शकते. त्यामुळे आत्महत्या करणं हा मार्ग होऊ शकत नाही. जास्त भावनिक न होता, जास्त विचार न करता यातून बाहेर पडायला हवं. ही वेळ देखील निघून जाईल यावर विश्वास ठेवायला हवा.

'सुशांतची आत्महत्याचं'

सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा तो घरात एकटाच नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते, अशी माहितीही समोर येत आहे. पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून काही कागदपत्र मिळाली आहेत, यामधून तो डिप्रेशनमधून जात होता, हे दिसत आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली आहे. संशयास्पद असं सध्या तरी काही हाती लागलेलं नाही, असं झोन ९ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले. 

पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडियाचाही तपास केला जात आहे. सुशांत बऱ्याच कालावधीपासून सोशल मीडियापासून लांब आहे. सुशांतने शेवटचं ट्विट २७ डिसेंबर २०१९ ला केलं होतं. यानंतर तो ट्विटरवर ऍक्टिव्ह नव्हता. इन्स्टाग्रामवर त्याने शेवटची पोस्ट ३ जूनला केली होती. या पोस्टमध्ये त्याने आईचा फोटो शेयर केला होता.