सलमानसोबत लग्न करण्याची स्वप्न पाहणारी अभिनेत्री आज काय करतेय पाहिलं?

एकेकाळी पाहिली सलमानसोबत लग्न करण्याची स्वप्न, पाहा आज त्या अभिनेत्रीला काय करावं लागतंय?

Updated: Feb 15, 2022, 03:57 PM IST
सलमानसोबत लग्न करण्याची स्वप्न पाहणारी अभिनेत्री आज काय करतेय पाहिलं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खान, याच्यासोबत झळकलेलेल अनेक चेहरे आज कुठच्या कुठे पोहोचले आहेत. यारोंका यार अशी ओळख असणाऱ्या सलमानने आजवर अनेकांनाच या कलाजगतामध्ये नाव कमवण्यासाठी मदत केली. (salman khan )

या सर्व प्रवासामध्ये त्याचं नाव अनेकांशीच जोडलं गेलं. त्यापैकीच एक नाव असंही आहे, जिथे म्हणे सलमानशी लग्न करण्यासाठीही काहीजण उत्सुक असल्याचं कळलं. 

यातीलच एका अभिनेत्रीने म्हणजे परवीन दस्तूर इरानी. 'मैंने प्यार किया' या चित्रपटामध्ये परवीन सलमानच्या प्रेमात असल्याचं दाखवण्यात आलं. 

इतकंच काय, तर ती त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा बाळगून असल्याचंही पाहायला मिळालं. चित्रपटाती तिच्या नकारात्मक भूमिकेनं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

पण, पहिल्या चित्रपटानंतर तिला आणखी एका चित्रपटात संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र परवीन दिसेनाशी झाली. 

आपल्याला मनाजोग्या भूमिका मिळाल्या नसल्याची खंत तिनं एका मुलाखतीत व्यक्त केली. 

जवळपास 15 वर्षांसाठी तिनं एअर इंडियामध्ये एअर हॉस्टेस म्हणून काम पाहिलं. एक हेअरस्टारलिस्ट म्हणूनही तिनं काम केलं. 

बऱ्याच नाटकांसाठीही तिनं काम केलं, पण पुढे मात्र तिने चित्रपटांपासून दुरावा पत्करला. 

1990 च्या जवळपास तिला 'हम है राही प्यार के' या चित्रपटासाठीही साईन करण्यात आलं होतं. पण, त्यावेळी तिनं एअर इंडियाला पसंती दिली. 

पल्लवी जोशी हिच्यासोबत तिनं 'आरोहण' या मालिकेमध्येही काम केलं. आता हिच परवीन पुन्हा एकदा सीरिजच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'मडगांव- द क्लोज्ड फाइल' असं या सीरिजचं नाव असून आता परवीन या निमित्तानं प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.