बॉलिवूडेचे 'रिअल हिरो', यांच्यामुळे अभिनेत्री राहतात सुरक्षित

अनेक ठिकाणी अभिनेत्रींना संकटातून वाचवणारे बॉलिवूडेचे 'रिअल हिरो'... व्हिडीओ व्हायरल   

Updated: Jun 2, 2022, 09:56 AM IST
बॉलिवूडेचे 'रिअल हिरो', यांच्यामुळे अभिनेत्री राहतात सुरक्षित  title=

मुंबई : झगमगत्या विश्वात अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या कायम चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियामुळे काही क्षणात कोणतीही गोष्ट संपूर्ण जगाला  माहिती पडते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री किआरा आडवाणी बसमध्ये चढताना दिसत आहे. पण त्याठिकाणी जी गोष्ट घडली ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

व्हिडीओमध्ये कार्तिक सर्वप्रथम बसमध्ये चढतो. त्यानंतर किआरा देखील बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. पण किआराला तोकड्या कपड्यांमुळे बसमध्ये चढायला अडचण येत असल्याचं ती कार्तिकला सांगते. 

किआराने कार्तिकला ही गोष्ट सांगताचं अभिनेता बस खाली उतरतो आणि किआराच्या आडव्या बाजूला उभा राहतो. त्यानंतर किआरा बसमध्ये चढल्यानंतर कार्तिक तिच्या मागे बसमध्ये चढतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्तिकचा दुसरा चेहरा देखील चाहत्यांना कळाला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण अभनेत्याला 'The Perfect Gentleman' असं म्हणत आहे. 

त्यामुळे जेव्हा कोणत्याही ठिकाणी अभिनेत्रींना कोणतीही अडचण आली, तर अभिनेत्रींना सांभाळून घेण्यासाठी बॉलिवूडचे हे सुपर आणि रिअल हिरो असतात. 

किआरा आणि  कार्तिकबद्दल सांगायचं झालं, तर सध्या दोघांना 'भूल भुलैया 2' सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या सिनेमाची चर्चा आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाचा बोलबाला आहे.