चंकी पांडेच्या लेकीचे प्रताप; स्पेनच्या भर रस्त्यात 'या' अभिनेत्यासोबत झाली इतकी रोमॅण्टिक की...

Ananya Pandey Aditya Roy Kapoor Spain Pics Viral: बॉलिवूडमधून एक सनसनाटी खबर येते आहे. बॉलिवूडच्या दोन लोकप्रिय सेलिब्रेटींचे अत्यंत खाजगी फोटो व्हायरल झाले आहेत. स्पेनच्या भर रस्त्यावरील त्यांचे रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 12, 2023, 04:24 PM IST
चंकी पांडेच्या लेकीचे प्रताप; स्पेनच्या भर रस्त्यात 'या' अभिनेत्यासोबत झाली इतकी रोमॅण्टिक की...  title=
July 12, 2023 | ananya pandey and aditya roy kapoor spain romantic pics goes viral (Photo: Filmfare | Instagram)

Ananya Pandey Aditya Roy Kapoor Spain Pics Viral: कुणासोबत कोण कधी स्पॉट होईल याची काहीच खात्री नसते. कुण कोणाला डेट करेल आणि मग कोणाची प्रेमकहाणी सुरू होईल याचाही काहीच थांगपत्ता लागत नाही. सोबतच आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे आदित्य कपूर आणि अनन्या पांडे हिची... सेलिब्रेटी हे abroad ला जातात आणि मग तिथून त्यांचे फोटो व्हायरल होयला अजिबातच वेळ लागत नाही. सध्या असेच काहीसे फोटो याही दोघांचे व्हायरल झाले आहेत. यावेळी साधेसुधे नाही चक्क एकमेकांना बिलगून आणि एकमेकांच्या मिठीतले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फिल्मफेअरच्या अधिकृत इन्टाग्राम पेजवरून हे फोटोज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली असून चाहत्यांना त्या या अवस्थेत पाहून धक्का बसला आहे. ते एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. 

यावेळी ते दोघं लिस्बनमध्ये दिसत आहे. तिथल्या एका छानश्या अशा व्ह्यूवरती ते दोघं गेले आहेत. त्यामुळे तिथून त्यांचे काही फोटो हे व्हायरल होयला फारसा वेळ लागलेला नाही. यावेळी ते दोघं एकटेच दिसत असून त्यांचे व्हायरल झालेल्या फोटोत ते दोघं स्माईल करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर स्पेनसारख्या ठिकाणी PDA मुमेंटमध्ये कॅप्चर झालेले हे दोघं नक्कीच एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातून आता यावर ते दोघं काही हिंट देणार का याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. या फोटोत दोघंही कॅज्यूअल वेअरमध्ये दिसत आहेत. सोबतच एका फोटोत अनन्याला आदित्यनं मागून मिठी घेतल्याचे दिसते आहे. 

हेही वाचा - किती गं बाई हुश्शार! रणबीर कपूरच्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडला येतात तब्बल 'इतक्या' भाषा

अनन्या पांडे ही चंकी पांडेची मुलगी आहे तर प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरचा आदित्य रॉय कपूर हा भाऊ आहे. दोघंही एकाच इंडस्ट्रीतील आहेत आणि चित्रपटसृष्टीत दोघंही सक्रिय आहेत. अनन्या पांडे ही सध्या तरूणपिढीतली आघाडीची अभिनेत्री आहे. स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर अगदी ती ओटीटीवरही गाजली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 तर आदित्य रॉय कपूरही फार लोकप्रिय अभिनेत्यांपैंकी एक आहे. गेली अनेक वर्षे तो चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे त्यातून अनन्यामध्ये आणि त्याच्यात जमीन आसमानाचे अंतर आहे.