झी युवावरची 'बन मस्का' प्रेक्षकांना करणार बाय बाय

झी युवा वाहिनीवरील तरुणाईंच्या पसंतीची मालिका 'बन मस्का' आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय. ९ जूनपर्यंत ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे. 

Updated: Jun 1, 2017, 08:17 PM IST
झी युवावरची 'बन मस्का' प्रेक्षकांना करणार बाय बाय title=

मुंबई : झी युवा वाहिनीवरील तरुणाईंच्या पसंतीची मालिका 'बन मस्का' आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय. ९ जूनपर्यंत ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे. 

मैत्रेयी आणि सौमित्र यांच्या हटके आणि ट्विस्टी लव्हस्टोरी तसेच त्यांचे भन्नाट मित्र, आजच्या तरुणाईशी सहज जुळवून घेणारी आजी या सर्वांनीच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

मैत्रेयीची भूमिका शिवानी आणि सौमित्रची भूमिका शिवराजने साकारली होती. या मालिकेचे दिग्दर्शन विनोद लव्हेकर यांनी केलेय. तर संदेश कुलकर्णी आणि मनस्वी लता रवींद्र यांचे लेखन आहे.