अल्लू अर्जुनला मैत्री महागात पडली; 'या' कारणामुळे अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल

Case Registered Against Allu Arjun : अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल... जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

दिक्षा पाटील | Updated: May 12, 2024, 11:59 AM IST
अल्लू अर्जुनला मैत्री महागात पडली; 'या' कारणामुळे अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल title=
(Photo Credit : Social Media)

Case Registered Against Allu Arjun : काल 11 मे शनिवारी रोजी आंध्र प्रदेशच्या नांद्दालमध्ये लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अल्लू अर्जूननं त्याचा मित्र आणि YSRCP आमदार रवि चंद्र किशोर रेड्डीच्या घरी जाऊन आचार संहितेचा उल्लंघन केल्या प्रकरणात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारा दरम्यान, अल्लू अर्जुनची फक्त एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर  लोकांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे रवि नांद्दाल पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडूण येईल अशी आशा करण्यात येत आहे. अल्लू अर्जुननं रवि चंद्र किशोर रेड्डीच्या घरी जाण्याआधी निर्वाचन क्षेत्रचे  रिटर्निंग अधिकाऱ्यांनी माहिती दिली नव्हती. यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

13 मे रोजी राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीसाठी एकत्र मतदान होणार आहे. अल्लू अर्जुन रवि चंद्र किशोर रेड्डीला असलेला त्याचा पाठिंबा दाखवण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. तर त्याची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी गर्दी केली होती. तिथे आलेले सगळे चाहते हे 'पुष्पा, पुष्पा' असं ओरडत होतं. तर त्यासोबत स्नेहा रेड्डी त्याच्यासोबत बालकनीत उभी होती. तर यावेळी शिल्पा रवी आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे सोबत होतं. 

अल्लू अर्जुन विरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू आहे. ज्यामध्ये परवानगीशिवाय गर्दी जमवण्यास परवानगी नाही. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन आचारसंहितेचा भंग करताना आढळला. त्याचे तिथले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यामध्ये लोकांनी त्याला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याला चारही बाजूंनी घेरले होते. मात्र, पोलिसांनी त्याला कसेबसे सुरक्षित स्थळी नेले.

हेही वाचा : 'नसीरच्या कुटुंबानं धर्मपरिवर्तन करण्यास...', सासरच्यांविषयी रत्ना पाठक यांचा खुलासा

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो 'पुष्पा 2' मध्ये दिसणार आहे. तर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदाना आणि फहद फासिल दिसणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.