'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीचे मोठ्या पडद्यावर पदार्पण

स्नेहल ही 'चला हवा येऊ द्या'च्या 'होऊ द्या वायरल' पर्वाची विजेती

& Updated: Feb 25, 2020, 01:38 PM IST
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीचे मोठ्या पडद्यावर पदार्पण  title=

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या अभिनयाची चुणूक महाराष्ट्राला दाखवणारी अभिनेत्री स्नेहल शिदम ही चित्रपटात पदार्पण करत आहे. आगामी  'स्वीटी सातारकर' हा तिच्या करिअरमधला पहिला चित्रपट असणार आहे. 'स्वीटी सातारकर' चित्रपटाचे पोस्टर तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

*नमस्कार. तुम्हाला कळवण्यास आनंद होतोय की, माझा पहिला चित्रपट *"स्वीटी सातारकर"* *येत्या २८ फेब्रूवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.तुम्ही आता पर्यंत दाखवलेल्या प्रेमासाठी खुप धन्यवाद. हेच प्रेम माझ्या पहिल्या चित्रपटावर सुद्धा दाखवा आणि येत्या २८ फेब्रूवारी ला *"स्वीटी सातारकर"* *आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.* स्वीटीची जादू ३ मिलियन हुन जास्त लोकांवर झालीय, पण ही जादू शेखर वर चालणार का? २८ फेब्रुवारीपासून येतेय स्वीटी आणि शेखरची स्वीट अँड सॉल्टी कहाणी. #SweetySatarkar #28Feb2020 @sweetysatarkarfilm Director: @the.shabbir.naik Writer: #SumitGiri Producer: #MunafNaik | @santoshmulekarmusic An AVK Distribution Release @khwabeeda_amruta | @sangramsamel | #vijaynikam123 | @vinamrabhabal | @vandana.sardesaiw | #GauriJadhav | @pushkarlonarkar | @snehalshidam | #YogeshDixit | #KomalYadav | @sudhakar_omale | #FaisalKhan | #SunilSingh | #mangeshkangane | #SushantSawant | #SureshSharma | #VaibhavAndherkar | #PrashantVichare | @aakashpendharkar | @sachin_narkar_swaroop | #RiyaTendulkar | @vikasPawar0310 |#HummingBees | @mandar.pimple | @darshanmediaplanet | @avkentertainment19 | @rajshrimarathi | @vizualjunkies

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam) on

स्नेहल ही 'चला हवा येऊ द्या'च्या 'होऊ द्या वायरल' पर्वाची विजेती आहे. किर्ती महाविद्यालयाची विद्यार्थीनी असलेल्या स्नेहलने अनेक एकांकिकांमध्ये उत्कृ्ष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक पटकावले आहे.

snehal shidam

व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर देखील तिच्या अभिनयाचे कौतूक झाले. 'चला हवा येऊ द्या' सोबतच 'ओवी' या व्यावसायिक नाटकामधून ती प्रेक्षकांसमोर आली.

ट्रेलर लॉंच 

'स्वीटी सातारकर' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांची चागंली पसंतीही मिळत आहे. चित्रपटात खटकेबाज संवाद, जबरदस्त संगीत पाहायला मिळतंय. 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय..' अशा खटकेबाज संवादांनी ट्रेलरमधून चित्रपट चांगलाच धम्माल असणार असल्याचं समजतंय. 

शब्बीर नाईक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. 

येत्या २८ फेब्रुवारीला 'स्वीटी सातारकर' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, जबरदस्त संगीत असणारा 'स्वीटी सातारकर' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.