CID फेम डॉ. तारिकाचा सिनेसृष्टीला रामराम? आता करतेय 'हे' काम

'सीआयडी' या मालिकेतील डॉ. तारिका हे पात्र चांगलेच गाजले. आता डॉ. तारिका काय काम करते? आणि ती कशी दिसते? याची माहिती समोर आली आहे. 

Updated: Jan 31, 2024, 06:29 PM IST
CID फेम डॉ. तारिकाचा सिनेसृष्टीला रामराम? आता करतेय 'हे' काम title=

Where Is CID Dr Tarika : छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे सीआयडी. या मालिकेने सर्वांचीची मनं जिकंली. या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे आजही लोकप्रिय आहेत. या मालिकेने 2018 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. 'सीआयडी' या मालिकेतील डॉ. तारिका हे पात्र चांगलेच गाजले. इन्स्पेक्टर अभिजीत आणि तारिका यांची जोडी लोकप्रिय ठरली होती. आता डॉ. तारिका काय काम करते? आणि ती कशी दिसते? याची माहिती समोर आली आहे. 

सीआयडी या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा मुसळेने या मालिकेत डॉ. तारिका हे पात्र साकारलं होतं. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेले डॉ. तारिका हे पात्र प्रचंड गाजले. यात ती डॉक्टरांच्या भूमिकेत झळकली होती. यात ती प्रामुख्याने मृतदेहांची तपासणी करत त्यातून एखाद्या प्रकरणाचा सुगावा काढणे असे पात्र साकारताना दिसली. त्यासोबत तिची आणि इन्स्पेक्टर अभिजीत ही जोडीही कायमच चर्चेत असायची. पण आता श्रद्धा मुसळेचा लूक पूर्णपणे बदलला आहे. 

सिनेसृष्टीला रामराम

श्रद्धा मुसळेने सीआयडी या मालिकेद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण आता तिचा लूक पू्र्ण बदलला आहे. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. ती 'शोभा सोमनाथ की', 'कहानी घर घर की', 'क्या दिल में है', 'मिले जब हम तुम' आणि 'एक हजारों में मेरी बहना है' या सारख्या मालिकांमध्ये झळकली. विशेष म्हणजे 2009 मध्ये श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ऑल द बेस्ट हा तिचा पहिला चित्रपट होता. यात ती अजय देवगणसोबत झळकली होती. त्यात तिने बेटी हे पात्र साकारले होते. 

त्यानंतर मात्र श्रद्धाने सिनेसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा ही आता एक महिला उद्योजक झाली आहे. तिने नुकतंच एक नवीन कंपनी सुरु केली आहे. फ्यूचर तयारी असे श्रद्धाच्या नव्या कंपनीचे नाव आहे. ही एक इज्युकेशन टेक्निकल स्टार्टअप कंपनी आहे. याद्वारे ती लोकांचे भवितव्य घडवणार आहे. 

श्रद्धा मुसळेचे पती आहेते मोठे उद्योजक

श्रद्धा मुसळे ही विवाहित आहे. तिने 2012 मध्ये दीपक तोमर या व्यावसायिकाशी लग्नगाठ बांधली. श्रद्धाला कधीही अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा नव्हती. तिला कायमच Hospitality इंडस्ट्रीत काम करायचे होते. विशेष म्हणजे श्रद्धाने मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेतही भाग घेतला होता. ती 2002 मध्ये यात सहभागी झाली होती. याच वर्षी अभिनेत्री नेहा धुपियानेही या स्पर्धेत भाग घेतला होता. नेहा धुपिया आणि श्रद्धा ही एकमेकांची रुममेट होती.