शाहरुख खानला पहिला ब्रेक देणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन

कर्नल राज कपूर यांचे बुधवारी रात्री रुग्णालयात निधन झाले.

Updated: Apr 12, 2019, 04:06 PM IST
 शाहरुख खानला पहिला ब्रेक देणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड 'बादशाह' शाहरुख खानला टिव्हीवर पहिला ब्रेक देणारे दिग्दर्शक कर्नल राज कपूर यांचे निधन झाले आहे. ते ८७ वर्षांचे होते. कर्नल राज कपूर यांच्या कुटुंबियांनी राज कपूर यांच्या निधनाबाबत सोशल मीडिया फेसबुकवरून दिली. 'आईएएनएस'ने दिलेल्या माहितीनुसार, कर्नल राज कपूर यांचे बुधवारी रात्री रुग्णालयात निधन झाले. 

कर्नल राज कपूर यांची मुलगी ऋतंभरा यांनी बुधवारी रात्री १० वाजून १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले. ते रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती. परंतु अचानकपणेच त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. 

राज कपूर यांनी शाहरुख खानला आपली टिव्ही मालिका 'फौजी'मध्ये काम करण्याची संधी दिली होती. याच मालिकेच्या माध्यमातून शाहरुखने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. याच मालिकेनंतर प्रेक्षकांमध्ये शाहरुखने आपली खास ओळख निर्माण केली. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर राज कपूर यांनी सेनेतून निवृत्ती घेतली. त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. तसेच अनेक चित्रपट तसेच जाहीरातींमध्येही काम केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'When Shiva Smiles' या नॉव्हेलचे प्रकाशन केले होते.