लग्नाच्या १२ वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पोटगी म्हणून यो-योला मोजावे लागणार 'इतके' कोटी

 'चार बॉटल वोडका', 'अंग्रेजी बीट', 'ब्लू आईज' आणि 'मनाली ट्रान्स' सारखी अनेक सुपरहिट पार्टी साँग देणारा लोकप्रिय गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Updated: Nov 8, 2023, 01:47 PM IST
लग्नाच्या १२ वर्षांनंतर हनी सिंगचा घटस्फोट, पोटगी म्हणून यो-योला मोजावे लागणार 'इतके' कोटी title=

मुंबई :  'चार बॉटल वोडका', 'अंग्रेजी बीट', 'ब्लू आईज' आणि 'मनाली ट्रान्स' सारखी अनेक सुपरहिट पार्टी साँग देणारा लोकप्रिय गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी गायक प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण त्याच्या कोणत्याही गाण्यामुळे नसून पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आहे. काही काळापूर्वी हनी सिंग त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.

शालिनी तलवार यांनी हनी सिंगवर अनेक आरोप केले होते
हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. इतकंच नाही तर हनी सिंगने अनेक महिलांसोबत 'कॅज्युअल रिलेशन' देखील ठेवले होते, त्यामुळे तिला त्याच्यापासून वेगळं व्हायचं आहे, असं शालिनीने सांगितलं होतं. यासोबतच शालिनीने गायकावर असाही आरोपही केला होता की, हनी सिंग तिचे अनेक दिवसांपासून शारीरिक शोषण करत आहे. आणि तिच्यावर मानसिक हिंसाही करत आहे त्यानंतर शालिनीने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि हनी सिंगकडून 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली.

12 वर्षानंतर तुटणार लग्न
आता अलीकडेच मंगळवारी दिल्ली न्यायालयाने हनी सिंग आणि शालिनी यांना घटस्फोट मंजूर केला आहे. लग्नाच्या 12 वर्षानंतर त्यांचे मार्ग आता कायमचे वेगळे झाले आहेत. त्यामुळे हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. मात्र, कोर्टाने लग्नाला आणखी एक संधी देण्याबाबत हनी सिंगचं मत विचारलं होतं, त्याला गायकाने नकार दिला होता. आता घटस्फोटानंतर गायकाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. माजी पत्नीला पोटगी म्हणून करोडो रुपये द्यावे लागतील.

चक्क एवढी रक्कम हनी सिंग पोटगी म्हणून देणार आहे
वास्तविक, शालिनी तलवार यांनी हनी सिंगकडून नुकसानभरपाई म्हणून १० कोटी रुपयांची मागणी केली होती. जी आता 1 कोटीवर आली आहे. या रकमेबाबत दोघांमध्ये करार झाला आहे. अशा परिस्थितीत, गायक आता त्याच्या माजी पत्नीला 1 कोटी रुपये देणार आहे.