Bollywood नंतर डी गँगच्या Tollywood मध्ये कुरापती! NIA चा मोठा खुलासा

छोटा शकीलनं आपल्या कुटुंबीयांमार्फत ही गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यानं ही गुंतवणूक कशी केली आणि कोणी केली याचा शोध सुरु आहे. 

Updated: Jan 16, 2023, 10:52 AM IST
Bollywood नंतर डी गँगच्या Tollywood मध्ये कुरापती! NIA चा मोठा खुलासा title=

D Gang In Tollywood : बॉलिवूडला मागे टाकत टॉलिवूड पुढे जात असल्याचे पाहता आता अंडरवर्ल्डने तेथे त्यांचे काम करायला सुरुवात केले आहे. त्यांच्या ओळखीतील आणि जे कलाकार काम करण्यासाठी तयार आहेत. यात मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक करत आहेत. याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मिळाल्याचे म्हटले जात आहे. छोटा शकीलनं आपल्या कुटुंबीयांमार्फत ही गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यानं ही गुंतवणूक कशी केली आणि कोणी केली याचा शोध सुरु आहे. (D Gang)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी म्हणजे फक्तच एकच भाषा नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा चार भाषा मिळून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ओळखली जाते. त्यामुळे त्यांच्यात होणारी पैशांची गुंतवणूक ही अब्यावधींच्या घरात आहे. या चारही भाषेत असलेले चित्रपट जेव्हा हिंदीत डब होतात तेव्हा त्यातून देखील निर्माते कोटींच्या घरात कमाई करतात. हे पाहता आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमने त्यांचा मोर्चा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळवला आहे. खरंतर डी गॅंगनं त्यांचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांचे वर्चस्व करायला सुरुवात केल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) लागल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, त्याचा संबंध अनेक मोठ्या कलाकारांसोबत असल्याचे म्हटलं जाते. (South Indian Movie Industry)

राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) नं या सगळ्या गोष्टींचा तपास सुरु केला असता. या ऑपरेशनमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. असे म्हटले जाते की शकीलच्या कुटुंबातील एक स्त्री अभिनेत्री म्हणून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष वेधी बाब म्हणजे छोटा शकीलची आवडती अभिनेत्री असलेल्या मुमताज यांच्या नावाचा वापर करत टॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवत आहे. याशिवाय गेल्या वर्षी फेब्रुवारीत तिच्या बॅंक खात्यात छोट्या शकीलच्या कुटुंबाकडून लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची खूप मोठी बातमी समोर आली आहे. 

हेही वाचा : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?

दरम्यान, असे म्हटले जाते की डी कंपनीतील छोटा शकीलचा (Chhota Shakeel) मेहुणा आणि सध्या अटकेत असलेला शेख ऊर्फ आरिफ भाईजान याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीनं चेन्नईतून टॉलिवू़मधून करिअर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या तिच्याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तिला मुमताज यांच्या नावाचा वापर करून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम मिळाले आहे. यानंतर मात्र, तिनं मागे वळून पाहिले नाही. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सुपर हिट चित्रपट देत ती लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे. फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये तिच्या खात्यात सगळ्यात आधी 6 लाख आणि नंतर 4 लाख असे 10 लाख रुपये पाठवण्यात आले.