इतकी बोल्ड! धर्मेंद्र यांची होणारी सून नेमकं काय करते? फोटोंचीच एवढी चर्चा

सोबतच ही आहे तरी कोण इथपासून त्याच्या कथित प्रेयसीच्या नावापर्यंत बरंच काही चर्चेत आलं.   

Updated: May 21, 2022, 01:21 PM IST
इतकी बोल्ड! धर्मेंद्र यांची होणारी सून नेमकं काय करते? फोटोंचीच एवढी चर्चा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभय देओल यानं साधारण वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर एका मुलीसोबतचे फोटो शेअर केले. अभय या फोटोंमध्ये तिच्यासोबत इंटिमेट होताना दिसला होता. सूत्रांच्या माहितीनुसार ही अभयची प्रेयसी असल्याचं सांगण्यात आलं. ज्यानंतर आता, अभय आता लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

अभय नेमका कोणाशी लग्न करणार याच्या चर्चा होतानाच तिच्यासोबतचे त्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. सोबतच ही आहे तरी कोण इथपासून त्याच्या कथित प्रेयसीच्या नावापर्यंत बरंच काही चर्चेत आलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार अभय शिलो शिव सुलेमान नावाच्या एका आर्टिस्टला डेट करत आहे. शिलोची इन्स्टा प्रोफाईल पाहिली असता तिच्या कलेचे असंख्य नमुने इथं पाहायला मिळतात. 

लिंगभेदाविरोधात आवाज उठवण्यासाठी 400 कलाकारांना एकत्र आणण्याची मोहिम तिनंच सुरु केली होती. आई निलोफर यांनी शिलोला मोठं केलं. फार कमी वयापासूनच तिनं चित्र काढण्यास आणि लिखाणास सुरुवात केली. (dharmendra nephew Abhay Deol rumored girlfriend shilo shiv suleman photos )

पुढे ती इलस्ट्रेटर आणि ब्लॉगरही झाली. वयाच्या 16 व्या वर्षी तिनं लहान मुलांसाठी एका पुस्तकाचं इलस्ट्रेशन केलं होतं. कलेच्या एका वेगळ्या आणि तितक्याच उत्कट प्रकारासाठी शिलोचा काही पुरस्कारांनी गौरवही करण्यात आला होता. 

शिलोच्या पोस्ट, त्याचे कॅप्शन आणि तिनं सादर केलेली कला पाहता एक कलाकार म्हणून ती नेमकी कसा विचार करते याचा अंदाज अगदी क्षणार्धातच येत आहे.