'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें'मधील काजोलची बहीण तुम्हाला आठवते? आता दिसते खूपच ग्लॅमरस, Photo Viral

Chukti From DDLJ: हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक सिनेमे गाजले ज्यांनी अनेकदा चर्चा ही रंगली होती. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें'. या चित्रपटानं एक वेगळाच माईलस्टोन सेट केला परंतु या चित्रपटातील चुटकी आता काय करते तुम्हाला ठाऊक आहे का? 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 19, 2023, 10:33 PM IST
 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें'मधील काजोलची बहीण तुम्हाला आठवते? आता दिसते खूपच ग्लॅमरस, Photo Viral  title=
June 19, 2023 | dilwale dulhaniya le jayenge chuktki aka pooja ruparel latest photos goes viral

Chukti From DDLJ: 'दिलवाले दुलनिया ले जायेंगे' हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. आजही या चित्रपटाची चर्चा होताना दिसते. त्यामुळे आपण परत परत हा चित्रपट पाहतो आणि आपल्याला या चित्रपटातील सर्वत्र पात्रं ही प्रचंड आवडताना दिसतात. त्यातील काजोलच्या बहीणीची म्हणजेच चुटकीची. तुम्हाला माहितीये का सध्या ही अभिनेत्री काय करते? 27 वर्षांमध्ये चुटकी पुर्णत: बदलली आहे. तिचे फोटो हे सोशल मीडियावर अनेक व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा होताना दिसते. आता पुन्हा तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तुम्ही पाहिलीत का की आता चुटकी कशी दिसते? तिचे लेटेस्ट फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्याला कायमच सेलिब्रेटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायचे असते. 

या चित्रपटाच्या चाहत्यांनाही असं कायमच वाटतं असतं की या चित्रपटातील कलाकार आपल्या पर्सनल आयुष्य असं नक्की करतात तरी काय? तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की आता सध्या ही चुटकी करते तरी काय? तुम्हाला चुटकीविषयी कदाचित फारसं काही माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला तिच्याविषयी सांगणार आहोत. पूजाचा जन्म हा 21 नोव्हेंबर 1980 साली झाला. तिनं 1993 साली 'किंग अंकल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु सर्वात जास्त लोकप्रियता तिला मिळाली ती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें' या चित्रपटातून. या चित्रपटात शाहरूख खान आणि काजोलच्या प्रमुख भुमिका होत्या. या चित्रपटात तिनं काजोलच्या बहिणीची म्हणजेच चुटकीची भुमिका केली होती. 

तिच्या त्या दोन वेण्या, चष्मा आणि पंजाबी ड्रेस यामुळे तिच्या लुकवर सगळेच भाळून गेले होते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती आणि सोबतच तिच्या अभियनानंही तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती. पूजा ही स्वत: एक स्टॅण्डअप कॉमेडीयन आहे आणि ती गायिकाही आहे. तेव्हा तिच्या चित्रपटांच्याही अनेकदा चर्चा सुरू असतात. तेव्हा ती अगदीच तेरा वर्षांची होती जेव्हा तिनं या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिनं फक्त चित्रपटच नाही तर अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती सोशल मीडियावरही फार सक्रिय आहे. त्यातून ती आपल्या चाहत्यांनाही अपडेट करत असते आणि चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या तिचे हे फोटोजही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.