कमवते किती आणि.... अनुराग कश्यपच्या लेकिचा महिन्याचा खर्च ऐकून विचारात पडाल

सतत ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

Updated: Dec 31, 2021, 01:00 PM IST
कमवते किती आणि.... अनुराग कश्यपच्या लेकिचा महिन्याचा खर्च ऐकून विचारात पडाल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मुलगी कला जगतापासून काहीशी दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती चांगलीच सक्रिय आहे. सतत ती काही नवनवीन पोस्ट शेअर करत असते. कधी प्रियकरासोबते खास क्षण सर्वांच्या भेटीला आणत असते.

अनुरागची लेक, आलिया ही तिच्या राहणीमानामुळंही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. आलियाच्या पोस्टमुळं तिची जीवनशैली लगेचच लक्षात येते. आलियाचा इतका खर्च हा विचारात पाडणारा आहे.

मुख्य म्हणजे आलियानं काही दिवसांपूर्वीच वडील, अनुराग कश्यपला एक पार्टीही दिली होती. लेकीनं स्वखर्चानं आपल्याला पार्टी दिल्याचा अनुरागलाही आनंद होता.

आता तुम्ही म्हणाल ही आलिया नेमकी करते तरी काय? तर, आलिया सर्वाधिक पैसे कपड्यांवर खर्च करते. एका मुलाखतीत तिनंच याचा खुलासा केला होता.

मी ऑनलाईन शॉपिंगवर जास्त खर्च करते. मला ठाऊक आहे की ही सवय चांगली नाही. मी दोन आठवड्यात 3-4 वेळा सामान मागवते, असं आलियानं सांगितलं.

मला खाण्यापिण्याची आवड असल्यामुळं कपडे आणि खाणं या गोष्टींवरच खूप खर्च होतो हे आलियानं कबुल केलं.

आपल्या या सवयीवर ताबा मिळवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करत असल्याचं तिनं म्हटलं.

नव्या वर्षात आलिया आरोग्यास पूरक अशाच गोष्टी खाण्यावर आणि सुदृढतेवर भर देताना दिसणार आहे. सध्याचा काळ पाहता निरोगी आयुष्याचं महत्त्वं तिच्याही लक्षात आलंय असं म्हणायला हरकत नाही.

आलियानं तिच्या जीवनात वडील आणि मित्रपरिवाराला फार महत्त्वं दिलं आहे. त्यांच्यामुळं 2021 हे वर्ष अतिशय चांगलं गेल्याचं ती न विसरता म्हणाली.