चर्चा मुग्धा-प्रथमेशच्या फोटोंची; लग्नानंतर पहिल्यांदाच गावी सेलिब्रिटी कपल, नातेवाईकांचा जल्लोष

अनेकदा मुग्धा आणि प्रथमेश त्यांच्या आयुष्यात सध्या काय सुरु आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अपडेट्स देत असतात. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुग्धा-आणि प्रथमेश लग्नबंधनात अडकले होते. 

Updated: Mar 21, 2024, 02:31 PM IST
चर्चा मुग्धा-प्रथमेशच्या फोटोंची; लग्नानंतर पहिल्यांदाच गावी सेलिब्रिटी कपल, नातेवाईकांचा जल्लोष title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटील चॅम्प्स या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेले पंचरत्न आज कोणाला माहिती नाही. या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. आजही या पाचही जणांना पंचरत्नम्हणूनच ओळखलं जातं. आधी कार्तिकी गायकवाडने लग्नगाठ बांधली मग रोहित राऊतनेदेखील लग्न केलं. यांच्या पाठोपाठ आता मुग्धा आणि प्रथमेश लग्नबंधनात अडकले. गेल्यावर्षीच्या शेवटच्या आठवड्यात या जोडीनं लग्न केलं. चाहत्यांनाही या जोडीच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेण्यासाठी फार आवडतं. ही सेलिब्रिटी जोडी त्यांचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करत असतात.

अनेकदा मुग्धा आणि प्रथमेश त्यांच्या आयुष्यात सध्या काय सुरु आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अपडेट्स देत असतात. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुग्धा-आणि प्रथमेश लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला जवळची मित्र मंडळी आणि अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. हा शाही लग्नसोहळा कोकणात मोठ्या दिमाखात पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. याचबरोबर या दोघांनी आत्तापर्यंत केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर संपुर्ण देशभरात एकत्र गायनाचे शो केले आहेत. या दोघांचाही चाहता वर्ग खूप मोठा आहे. या दोघांच्या जोडीलाही प्रेक्षक नेहमी पसंती देतात.

सध्या मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊन्टवरुन काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिच्यासोबत तिची भावंड आणि प्रथमेशही दिसत आहे. लग्नानंतर मुग्धाने अनेकदा सासरचे बरेच फोटो पोस्ट केले होते. मात्र आता मुग्धाने माहेरचे फोटो केले आहेत. यावेळी गायिकेने कुटुंबीयांबरोबर एकत्र जेवण व धमाल केली. मुग्धा वैशंपायन तिच्या आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास नवऱ्याबरोबर साजरा करण्यासाठी तिच्या माहेरी अलिबागला गेली होती. यानिमीत्ताने तिची भावंड एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. याचे फोटो मुग्धाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुग्धाने तिच्या सोशल मीडियावर एक फॅमेली फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे मुग्धाने एक साग्रसंगीत दाक्षिणात्य जेवणाचा फोटो देखील शेअर केला होता. आंबोळी-बटाट्याजी भाजी, सांभार-चटणी असलेला हा फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  तर प्रथमेशनेही त्याच्या सासू सासऱ्यांसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.