'कॉस्मोपॉलीटन मॅग्झिन'वर दिशा पटानीने दाखवले एब्स

दिशा पटानीचं ‘कॉस्मोपॉलीटन मॅग्झिन’साठी केलेल फोटोशूट सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलय. तिने हा फोटो ट्विटरवर शेयर केला होता.

Updated: May 20, 2018, 08:05 AM IST
'कॉस्मोपॉलीटन मॅग्झिन'वर दिशा पटानीने दाखवले एब्स title=

मुंबई : 'बागी २' च्या यशानंतर अभिनेत्री दिशा पटानीला कोणता सिनेमा मिळाला नसल्याची बॉलीवूडमध्ये चर्चा होती. पण तिच्या हाती चागंलाच जॅकपॉट लागलाय. सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भुमिका असलेल्या 'भारत' सिनेमात तिची निवड करण्यात आली आहे. सलमानसोबत काम करण हे नव्या अभिनेत्रींच्या यशाच गणित मानल जात म्हणून दिशासाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. एका भुमिकेसाठी दिशाची निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. दिशा पटानीचं ‘कॉस्मोपॉलीटन मॅग्झिन’साठी केलेल फोटोशूट सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलय. तिने हा फोटो ट्विटरवर शेयर केला होता.

‘कॉस्मोपॉलीटन मॅग्झिन’च्या कव्हरवर 

 दिशा पटानी ‘कॉस्मोपॉलीटन मॅग्झिन’च्या कव्हरवर झळकली आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. डेनिम जॅकेटमध्ये छानशी स्माईल देत ती सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. दिशा फिटनेस फ्रीक असल्याने तिचे एब्सही कव्हरवर दिसत आहे.

७० वर्षांचा इतिहास 

दिशा पटानी काम करत असलेल्या आगामी भारत या सिनेमात फाळणीची कहाणी असून भारताचा ७० वर्षांचा इतिहास असणार आहे. यासाठी दिग्दर्शक अली अब्बास बॉर्डरवर शुटींगसाठी योग्य लोकेशनच्या शोधात आहेत. अली अब्बास आणि सलमान यांच्या जोडीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी या जोडीन 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. २०१९ साली भारत रिलीज होणार आहे. खूप मोठ्या काळानंतर प्रियांका चोप्रा या सिनेमातून समोर येणार आहे.