हे आहे बॉलिवूडच्या हॉट सीन्सचं वास्तव!

 बॉलिवूडच्या कित्येक सिनेमांमध्ये आता हॉट सीन्सचा भडीमार होत असतो. अलिकडे तर अनेक नव्या हिरोईन्स हॉट सीन्स देण्यात अजिबात घाबरत नाहीत. पण काही असे सीन्स देण्यास नकार देतात.

Updated: Nov 10, 2018, 09:39 PM IST
हे आहे बॉलिवूडच्या हॉट सीन्सचं वास्तव! title=

मुंबई : बॉलिवूडच्या कित्येक सिनेमांमध्ये आता हॉट सीन्सचा भडीमार होत असतो. अलिकडे तर अनेक नव्या हिरोईन्स हॉट सीन्स देण्यात अजिबात घाबरत नाहीत. पण काही असे सीन्स देण्यास नकार देतात.

अनेक मोठ्या अभिनेत्री हॉट सीन्स करताना आपण पाहिल्या असतील. पण यातील काहीच हिरोईन्स या स्वत: हे सीन्स करतात. ब-याच हिरोईन्स असे सीन्स करण्यासाठी बॉडी डबल वापरतात. 

नंदीता दास (फायर)

दीपा मेहता यांच्या या सिनेमात होमोसेक्श्युअल विषयावर भाष्य करण्यात आलं होत्म. या सिनेमात शबाना आझमी आणि नंदीता दास यांचे अनेक हॉट सीन्स होते. हे सीन्स करण्यासाठी त्यांच्या बॉडी डबलला बोलवण्यात आलं होतं. 

प्रियंका चोप्रा(७ खून माफ)

या सिनेमात प्रियंका प्रेमासाठी भटकत असते. अशात तिची भेट इमरान खानसोबत होते. या दोघांमध्ये एक हॉट सीन चित्रीत करण्यात आलाय. हा सीन प्रियंकाच्या बॉडी डबलने केला होता. 

सनी लिओनी(एक पहेली लीला)

सनी जितकेही हॉट सीन करते त्यासाठी तिची एक अट असते. सनी सिनेमा करण्याआधी एक अट ठेवते की, सिनेमातील सर्वच हॉट सीन्स ती तिच्या पतीसोबत शूट करेल. एक पहेली लीला या सिनेमातील सर्वच सीन्स तिने पतीसोबत शूट केले आहेत. 

मनीषा कोईराला(एक छोटी सी लव्हस्टोरी)

मनीषा कोईराला तिच्या करीअरच्या एका वळणावर एक असा सिनेमा करावा लागला होता, ज्यात हॉट सीन्सचा भडीमार होता. हा सिनेमा हॉट सीन्समुळे खूप गाजला होता. पण या सिनेमातील सर्व हॉट सीन्स मनीषाने नाही तर तिच्या बॉडी डबलने केले होते. 

मल्लिका शेरावत (हिस्स)

या सिनेमात मल्लिकाने नागिनचा रोल केला होता. या सिनेमातील न्यूड सीन्स बॉडी डबलने केल्याचा मल्लिकाने नकार दिला होता. पण सिनेमाचा निर्माता आणि मल्लिकाच्या भावाने हे मान्य केलं होतं की, यातील काही सीन्स बॉडी डबलने केले होते.