Drishyam 2 च्या प्रीमियरमध्ये श्रिया सरनचे सर्वांसमोर लिपलॉक, सगळे पाहतच राहिले

Drishyam 2 Screening : दृश्यम 2 मध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे तर तब्बू  पोलीस महानिरीक्षक मीरा देशमुखच्या भूमिकेत आहे.

Updated: Nov 18, 2022, 12:01 PM IST
Drishyam 2 च्या प्रीमियरमध्ये श्रिया सरनचे सर्वांसमोर लिपलॉक, सगळे पाहतच राहिले title=

Drishyam Fame Actress Shriya Saran Liplock Photos: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला अजय देवगणचा 'दृश्यम 2' ( Drishyam 2 ) चित्रपट शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. सस्पेन्स थ्रिलर कथा असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'दृश्यम 2' ची देखील चर्चा आहे. 7 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. मुंबईत या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स पोहोचले होते. या प्रीमियर दरम्यान श्रिया सरनने (Shriya Saran) उघडपणे तिच्या पतीला लिपलॉक केले ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

'दृश्यम 2' चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. सोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि अक्षय खन्ना आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. मुंबईत झालेल्या या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरच्या स्टारकास्टने कॅमेऱ्यासमोर जोरदार पोज दिली. या दरम्यान पोज देताना अभिनेत्री श्रिया सरनने असे काही केले की, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

श्रिया सरन पती आंद्रेई कोशिवसोबत इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्रीने पापाराझींसमोर किलर पोज दिल्या आणि नंतर एकमेकांना लिप लॉक केले. श्रेया आणि तिचा नवरा लिप लॉक केलेले पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.

'दृश्यम 2' हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर पाहू शकता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये चित्रपटाची कथा लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात आले आहेत.