धर्माच्या सीमा ओलांडत राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मुस्लिम मित्राकडून हनुमान चालीसा पठण

डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड घोषित केलं आहे. 

Updated: Aug 19, 2022, 03:15 PM IST
धर्माच्या सीमा ओलांडत राजू श्रीवास्तव यांच्यासाठी मुस्लिम मित्राकडून हनुमान चालीसा पठण title=

Raju Srivastav : प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ आहे. 12 ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर वर्कआउट (WorkOut) करताना हृदयविकाराचा झटका आल्याने खाली पडले. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांना तात्काळ एम्समध्ये (AIIMS-All India Institute of Medical Sciences) दाखल करण्यात आलं होतं. 

गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड (Brain Dead) घोषित केलं आहे. 

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा आणि व्यवस्थापक मकबूल यांनी राजूची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. 

राजू श्रीवास्तव यांचे देशभरातील चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधील राजू श्रीवास्तवचा सहकलाकार एहसान कुरेशीही राजू श्रीवास्तवसाठी प्रार्थना करत आहे. राजूचे सर्व मित्र त्याच्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करत आहेत, असे एहसान कुरेशी यांनी सांगितले.

एहसान कुरेशीने सांगितले की,'मी त्याला ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ शेवटची भेटलो. झेंडू बिल्डिंगमध्ये त्यांचे कार्यालय आहे. जेव्हा तो लखनऊला यायचा तेव्हा मित्रांसोबत कॉफी प्यायचा. सुनील पाल आणि मी त्यांना भेटलो तेव्हा आम्ही त्यांच्याशी चित्रपटांसाठी अनुदानासाठी अर्ज करण्याबद्दल बोललो.

पिंकविलासोबत बोलताना एहसान कुरेशी यांनी सांगितले की, "डॉक्टरांनी गुढघे टेकले आहेत. त्यांनी राजू यांच्या कुटुंबियांना आश्वासन दिलं आहे की ते सर्व प्रयत्न करत आहेत. पण आता त्यांना फक्त कोणतातरी चमत्कारच वाचवू शकतो. त्यांच्या निधनाची खोट्या बातम्या समोर आल्या आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, ते ब्रेन डेड आहेत.त्यांची अवस्था गंभीर आहे. आम्ही सर्व मित्र त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. काही वेळापूर्वी आम्ही त्यांच्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करत होतो."

एहसान कुरेशी यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिचे लग्न होणार आहे आणि त्यांचा मुलगा खूपच लहान आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आम्ही सर्वजण त्याची खूप काळजी घेत आहोत आणि संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचू. राजूभाई लवकर बरे व्हावेत अशी आमची इच्छा आहे. 

दरम्यान,राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे.