'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला निवडणुकीपर्यंत स्थगिती देण्याची मागणी

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट ऐन निवडणूकीच्या वेळी 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Updated: Mar 29, 2019, 02:11 PM IST
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला निवडणुकीपर्यंत स्थगिती देण्याची मागणी  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपट 'पीएम नरेंद्र मोदी' वादाच्या भोवऱ्यात अडकला असून दिवसेंदिवस चित्रपटाच्या अडचणीत वाढ होत आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याबाबत सांगण्यात आले आहे. याचिकेत निवडणूकी दरम्यान चित्रपट प्रदर्शित केल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याने निवडणूक काळात 'पीएम नरेंद्र मोदी' प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. या याचिकेवर निवडणूक आयोगाकडून निर्मात्यांना नोटीस पाठवण्यात आली असून उत्तर देण्यासाठी 30 मार्चपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. 

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूक 2019 ची तयारी सुरू आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट ऐन निवडणूकीच्या वेळी 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. निवडणूकीवेळी चित्रपट प्रदर्शित करणं आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत चित्रपट निवडणूकीवेळी प्रदर्शित होणं योग्य नसल्याचं याचिकेत म्हटलं आहे. निवडणुकी काळात चित्रपटाचा मतदारांवर प्रभाव पडू शकतो. यामुळे निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो.

निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या निर्मात्यांना, म्यूजिक कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' 19 मे नंतर प्रदर्शित करण्यात येण्याची मागणी करण्यात येत आहे. संदीप सिंह आणि सुरेश ओबेरॉय चित्रपटाची निर्मिती केली आहे. विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.