ज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 26, 2023, 05:13 PM IST
ज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो title=

Malaika arora and Arjun kapoor Break Up : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच चर्चेत असते. मयालका आणि अर्जन कपूरचं रिलेशनही लपून राहिलं नाही. अनेक कार्यकर्मांमध्ये, पार्ट्यांमध्येही एकत्र दिसले होते. पण गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या (Break-Up) चर्चांना जोर आला आहे. अरबाज खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. मलायक-अरबाज (Malaika-Arbaz) अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 

मलायक-अर्जुन एकत्र स्पॉट
मलायका आणि अर्जुनने अनेकवेळा आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली दिली होती. दोघांचे एकत्रित फोटोही अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण अचानक असं काय घडलं की या दोघांचा ब्रेकअप झाला. यातच आता मलायकाने एक मोठं पाऊल उचललं आहे. मलयाकाने अर्जुन कपूरच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन अनफॉलो केलं आहे. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना आणखी जोर मिळाला आहे. अर्जुनच्या बहिणी जान्हवी कपूर, खूशी कपूर ,अंशुला कपूर आणि वडील बोनी कपूर यांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे.

'चला वेगळं होऊ या'
मलायका अरोराचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिच्या टी-शर्ट लिहिण्यात आलेल्या मेसेजचा अर्थ काय असा प्रश्न चाहते विचारत आहेत.  'Lets fall apart' असा मेसेज लिहिलेलं टी-शर्द मलायकाने परिधान केलं आहे. याचा अर्थ 'चला वेगळं होऊ या' असा होतो. या मेसेवर एक स्माइली देखील आहे. त्यामुळे ब्रेक-अपच्या चर्चांना आणखीनच जोर आला आहे. दरम्यान, मलायका किंवा अर्जुनने ब्रेकअपबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

अर्जुन कपूरची नवी गर्लफ्रेंड
मयालकाबरोबरच्या ब्रेकअपची चर्चा सुरु असतानाच अर्जुन कपूरचं नाव एका दुसऱ्या मुलीबरोबर जोडलं जात आहे. इल्फूएंसर कुशा कपिला आणि अर्जुन कपूर यांच्यात जवळीक वाढल्यांच बोललं जात आहे. अर्जुन आणि कुशा हे दोघं नुकतंच दिग्दर्शनक करण जोहरच्या घरी गेट टू गेदरमध्ये एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मलायका हजर नव्हती. अर्जुन कपूरने याआधी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर सुट्टीतले काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटा दिसत होता.

कुशा कपिलने तिच्या करिअरची सुरुवात कंटेट रायटर म्हणून केली. त्यानंतर ती एका कंपनीत काम करत होती, अण अचानक तीने नोकरी सोडली आणि पूर्पवेळ सोशल मीडिआ इन्फ्ल्यएन्झर म्हणून काम करु लागली.