कुकुडूकू! 'फिर हेरा फेरी' सिनेमात केळी मागणारी मुलगी आठवतेय, आता दिसते खूपच ग्लॅमरस... पाहा काय करते

'फिर हेरा फेरी' सिनेमातील बालकलाकाराची भूमिका साकारणारी मुलगी आता कशी दिसते, सोशल मीडियावर होतायत फोटो व्हायरल  

Updated: Nov 13, 2022, 03:51 PM IST
कुकुडूकू! 'फिर हेरा फेरी' सिनेमात केळी मागणारी मुलगी आठवतेय, आता दिसते खूपच ग्लॅमरस... पाहा काय करते title=

Angelina Idnani Photo Viral : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Sunil Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांची मुख्य भूमिका असलेला 'हेरा फेरी' (Hera Pheri) हा विनोदी सिनेमा हिट ठरला होता. यानंतर 'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा सिनेमाही चांगलाच गाजलाय. या सिनेमातील गाणि आणि विशेषत: परेश रावल यांनी साकारलेली बाबूरावची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. याशिवाय अक्षय कुमारने साकारलेला राजू आणि सुनील शेट्टी याने साकारलेली शामची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. या चित्रपटातील अनेक डायलॉगही चांगलेच गाजले. 

याशिवाय 'फिर हेरा फेरी' सिनेमातील अभिनेत्री, रायमा सेन, बिपाशा बासू यांचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला. पण याचबरोबर या सिनेमातील आणखी एक कलाकार प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या सिनेमात एका लहान मुलीने बालकलाकार म्हणून काम केलं, सिनेमात मजेदार अंदाजात ती 'कुकुडूकू' बोलताना दाखवली आहे. 
 
एंजलिना दिसते ग्लॅमरस
हेरा फेरी सिनेमात या मुलीचं काही गुंड अपहरण करतात, त्यांना चकवा देत ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटते. त्यानंतर तिची गाठ अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्याशी पडते. त्या मुलीला खूप भूक लागलेली असते आणि ती या तिघांकडे खायला केळी मागते. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहून हे तिघेही तिला खायला देतात. हा सीन चांगलाच गाजला होता. त्यावेळी आठ-नऊ वर्षांची असलेल्या या मुलीचं नाव आहे एंजलिना इदनानी (Angelina Idnani). एंजलिना इदनानी आता मोठी झाली असून ती खूपच सुंदर दिसते.

एंजलीना इदनानीचे फोटो व्हायरल
एंजलीना इदनानी हिने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी' या सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर एंजलीनाने 'तारा रम पम' सिनेमातही काम केलं. या दोन्ही सिनेमातील तीने केलेलं काम लोकांच्या चांगल्याच पसंतीस उतरलं आणि ती बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली. पण यानंतर ती बॉलिवूडमध्ये फारशी दिसली नाही. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत रहाते.

एंजलीना इदनानीने आपलं शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केलं. तर महाविद्यालयीन शिक्षण तीने सिंगापूरमध्ये पूर्ण केलं. यानंतर तीने फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. आज खूपच कमी लोकांनी एंजलीना कशी दिसते हे माहित असेल.

लहानपणापासून आईने केला सांभाळ
एंजलीना लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर लहानपणापासून आईनेच तिचा सांभाळ केला. एंजलीनाने सिनेमाबरोबरच अनेक जाहीरातीतही काम केलं आहे. एंजलीना बॉलिवूडपासून सध्या लांब असली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. नुकतेच तीने स्वत:चे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे आणि हे फोटो चांगलंचे व्हायरल होत आहेत. त्यामुळे एंजनीला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.