प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचे निधन

मित्रमंडळींकडून आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Aug 28, 2019, 02:11 PM IST
प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचे निधन  title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरच्या बहिणीचे निधन झाले आहे. कनिकाची बहीण एनाबेलाने या जगाचा निरोप घेतला आहे. खुद्द कनिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यामातून ही दु:खद बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या कठीण प्रसंगी सेलेब्रिटी तिच्या सोबत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My precious sister Annabel Rest In PeaceI have no words to express how I feel today! Worse day of my life.. holding on to all the beautiful memories forever Love you

 

इन्स्टाग्रामवर आपल्या बहिणी सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, 'माझ्या बहिणीचे निधन झाले आहे. देव तिच्या आत्म्यास शांती देवो. मी माझे दु:ख शब्दांमध्ये नाही सांगू शकत नाही. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे.'

कनिकाच्या या भावूक पोस्ट नंतर तिच्या मित्रमंडळींकडून आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. २०१२ मध्ये आलेल्या 'जुगनी जी'या म्यूझीक व्हिडिओ नंतर ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिनी 'रागिनी एमएमएस २' चित्रपटामध्ये 'बेबी डॉल' गाण्याला आवाज दिला होता. बॉलिवूडच्या अनेक हीट गाण्यांमागे कनीकाचा आवाज आहे.