सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

कास्टिंग काउचच्या बातम्या ग्लॅमर विश्वातून अनेकदा समोर येत असतात. 

Updated: Oct 17, 2022, 02:05 PM IST
सिनेसृष्टीला हादरवणारी बातमी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप title=

मुंबई : कास्टिंग काउचच्या बातम्या ग्लॅमर विश्वातून अनेकदा समोर येत असतात. केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर विविध इंडस्ट्रीमध्येही अभिनेत्रींना लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं. बंगाली अभिनेत्री सुकन्या दत्ता (Sukanya Dutta) हिने दिग्दर्शक बाप्पावर गंभीर आरोप लावले असून, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं तिने म्हटलं आहे. सुकन्याने तिच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने दिग्दर्शकाच्या फोटोसोबत लिहीलं आहे की, तिचं लैंगिक शोषण झालं आहे. दुसरीकडे, दिग्दर्शक बाप्पाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बोल्ड सीनचं वर्कशॉप प्रेशर
सुकन्याने बंगाली टीव्ही मालिका 'विजयिनी', 'दीप जले जाये' यासह इतर मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या फेसबुक पोस्टमध्ये सुकन्याने लिहिलं आहे की, 'त्याने तिला एका शॉर्ट फिल्मची ऑफर दिली. दीर्घ संवादानंतर समजलं की त्याच्यासोबत काम करायचं तर मला बोल्ड सीन्ससाठी वर्कशॉप करावं लागेल. मला समजलंच नाही की, त्याला सिनेमा बनवायचा होता की पॉर्न फिल्म. जेव्हा मी त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तो म्हणाला की मी लैंगिकदृष्ट्या अक्षम आहे. त्याने कोणत्या प्रकारची भाषा वापरली ते ईथे मला सांगता येणार नाही.

'डायरेक्टर व्हॉट्सएपवर कॉल करायचा'
सुकन्या पुढे म्हणाली की, रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून दिग्दर्शक तिला व्हॉट्सअॅपवर कॉल करतो. त्याच्या चित्रपटाची अभिनेत्री बनण्यासाठी तिला त्याच्यासोबत स्कूटरवरून प्रवास करावा लागेल. असंही तिने माध्यमांना सांगितलं.

दिग्दर्शकाने आरोप फेटाळून लावले
दुसरीकडे, या आरोपांवर बाप्पा म्हणाला की, मी सुकन्याला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. तिच्याकडून मला का टार्गेट केलं जात आहे हे समजत नाही. सुकन्या तिची फेसबुक फ्रेंडही नाही. जर कोणी त्याचा अशा प्रकारे अपमान केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू, असंही तो म्हणाला. सुकन्या विवाहित असून तिचा नवरा मुंबईतील संगीत जगताशी निगडीत आहे.