'आधी तुझ्या लेकिला सांभाळ'; चंकी पांडेवर कोणी ओढले ताशेरे?

चंकी पांडेची लेक अनन्याने असं काय केलं?  ज्यामुळे प्रसिद्ध व्यक्ती अभिनेत्याला देतेय लेकीला सांभाळण्याचा सल्ला...  

Updated: May 11, 2022, 10:17 AM IST
'आधी तुझ्या लेकिला सांभाळ'; चंकी पांडेवर कोणी ओढले ताशेरे? title=

मुंबई : अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अनन्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत कोरियोग्राफर फराह खान देखील दिसत आहे. 

व्हिडीओमध्ये अनन्या मेकअप करताना दिसत आहे. तेव्हा फराह त्याठिकाणी येते आणि अनन्याला म्हणते तुला 'खाली पिली' सिनेमासाठी नॅशनल पुरस्कार जाहीर झाला आहे...

ही गोष्ट ऐकून अनन्याला प्रचंड आनंद होतो. पण त्यानंतर फराह चंकी पांडेच्या स्टाईलमध्ये  "आई ऍम जोकिंग..." असं म्हणते...  सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनन्या पांडेने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, 'ओव्हर ऍक्टिंगसाठी 50 रुपये कट...' असं लिहत फराहला टॅग केलं आहे. एवढंच नाही तर चंकी पांडेने कमेंटमध्ये 'फराह व्हिडीओमध्ये जी ओव्हक ऍक्टिंग केली आहे, त्यासाठी पुरस्कार मिळायला हवा...' असं लिहिलं आहे. .

त्यानंतर फरहा कमेंटमध्ये 'चंकी तुझ्या मुलीला सांभाळ...' असा सल्ला दिला आहे. सध्या अनन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर अनेक सेलिब्रिटी आणि युजर्सने यावर कमेंट केल्या आहेत.