कोरिओग्राफर गणेश आचार्यविरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड कोरिओग्राफर आणि अभिनेता गणेश आचार्य याच्यावर गोमतीनगर पोलिसांनी आरोप केला आहे

Updated: Dec 7, 2022, 06:34 PM IST
कोरिओग्राफर गणेश आचार्यविरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : गंभीर मुद्द्यावरील वादात अडकण्याची ही कोरिओग्राफर गणेश आचार्यची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचे गंभीर आरोप केले असताना तिने गणेश आचार्य यांच्यावरही काही गंभीर आरोप केले होते. त्यावेळीसुद्धा त्याने आपल्यावरील आरोप फेटाळले होते. पण, तो खोटारडा असून एक दुतोंडी माणूस असल्याचं सांगत तनुश्रीने त्याच्यावर आगपाखड केली होती. मात्र पुन्हा एकदा गणेश यांच्या विरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'देहाती डिस्को' चित्रपटाचे निर्माते कमल किशोर यांच्याविरोधात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत गणेश आचार्य यांचंही नाव घेतलं होतं, मात्र पोलिसांनी त्यांचं नाव एफआयआरमध्ये नोंदवलं नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गणेश आचार्य यांचं नाव घेतलं.

बॉलिवूड कोरिओग्राफर आणि अभिनेता गणेश आचार्य याच्यावर गोमतीनगर पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रं तयार केल्याचा आरोप केला आहे. 31 ऑक्टोबर रोजी गोमतीनगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गणेश आचार्य यांचंही नाव आहे.

गणेश आचार्य यांच्यावर पैसे हडप केल्याचा आरोप
एफआयआरमध्ये गणेश आचार्यच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे कारण पीडितेने पोलिसांना सांगितलं की कोरिओग्राफरने तिला चित्रपटासाठी केटरिंगचं काम मिळवून दिलं होते. काम पूर्ण होऊनही तिला अद्याप मोबदला मिळालेला नाही. गणेश आचार्य आणि कमल किशोर यांनी पैसे देण्याची मागणी केली असता त्यांनी मोबाईल बंद केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, गणेश आचार्य आणि कमल किशोर यांनी त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला.

तपासाच्या सुरुवातीलाच गणेश आचार्य यांचंही नाव ५ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात जोडलं गेलं होतं. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर एडीसीपीकडून पीडितेच्या तक्रारीवर फिल्म प्रोड्यूसर कमल किशोर यांचं नाव घेतलं होतं आणि गणेश आचार्य यांचं नाव यावेळी त्या तक्रारीत नव्हतं मात्र ५ नोव्हेंबरला या तक्रारीमध्ये कोरिओग्राफरचं नाव जोडलं गेलं.  एडीसीपींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.