या गोष्टीसाठी अखेर गौरीने दिली शाहरूखला परवानगी

शाहरूख खान सध्या सहकुटुंब युरोपमध्ये हॉलिडे सेलिब्रेट करत आहे. 

Updated: Jul 9, 2018, 09:36 PM IST
या गोष्टीसाठी अखेर गौरीने दिली शाहरूखला परवानगी  title=

मुंबई : शाहरूख खान सध्या सहकुटुंब युरोपमध्ये हॉलिडे सेलिब्रेट करत आहे. युरोपच्या सौंदर्यांची सार्‍यांनाच भूरळ पडते. त्यामुळे फिरताना काही सुंदर क्षण कॅमेर्‍यामध्ये टिपले जातात. शाहरूख देखील फॅमिली ट्रीपमधील काही फोटो शेअर करत आहे. मात्र एका फोटोखाली त्याने खास मेसेज लिहला आहे. 

गौरी खानने दिली परवानगी 

शाहरूखने पत्नी गौरीसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटो वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पत्नीने मला तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची परवानगी दिली आहे. अशा आशयाचा मेसेज लिहला आहे. 

 

गौरी खानने त्याच्या मुलांचा फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये आर्यनने अब्राहमच्या डोक्यावर हात ठेवला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरा होत आहे. 

झिरो लवकरच येणार 

'झिरो' हा शाहरूखचा आगामी सिनेमा आहे. आनंद एल राय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. झिरो सिनेमा 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.