गौतमीचा नाद करायचा नाय! इतक्यांशी नावं जोडली पण नथीवर कोरलं 'हे' नाव

Gautami Patil : गौतमी पाटील हिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. तिचे कार्यक्रमही जोरात होताना दिसतात. आता सध्या तिनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिच्या नथीची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Updated: Aug 26, 2023, 03:25 PM IST
गौतमीचा नाद करायचा नाय! इतक्यांशी नावं जोडली पण नथीवर कोरलं 'हे' नाव title=
gautami patil shares a photo wearing a nath and her name on it

Gautami Patil : गौतमी पाटील सतत चर्चेत असते. तिची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या तिची चर्चा आहे ती म्हणजे तिच्या नथीची. सोशल मीडियावर गौतमी पाटील ही सतत चर्चेत असते. सबसे पाटील गौतमी पाटील, असं वाक्य तिच्यासाठी सतत ऐकायला मिळते. मध्यंतरी तिच्या प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली होती. महाराष्ट्राची जाजवल्य परंपरा असणाऱ्या लावणीचे चुकीचे, अश्लील आणि विभत्स प्रदर्शन करणाऱ्या गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली होती. 2022 पासून गौतमी पाटील हे नावं माध्यमांमध्ये खूप गाजते आहे. त्यातून तिच्या अश्लील गाण्यांमुळे तिच्यावर अनेकांनी तिखट टीका केली होती. आजही तिचे शो हे महाराष्ट्राच्या गावागावात होताना दिसतात. तिच्या या कार्यक्रमांसाठी आजही फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होताना दिसते. 

तिच्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं यावेळी आपला फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं नथ घातली आहे. ज्यावर तिनं खास नावही कोरलं आहे. गौतमी पाटीलच्या लव्ह अफेअरचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. तेव्हा तिच्या लग्नापर्यंतही गोष्टी गेल्या होत्या. तिला कसा मुलगा हवा याचाही जोरात चर्चा होती. परंतु तुम्हाला माहितीये का की, तिच्या या नथीवर कोणाचे नावं कोरलं आहे? तिनं या नथीवर आपलं नावं लिहिलं आहे.ही नथ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिच्या या सुंदर अशा या फोटोची. तेव्हा चला तर मग पाहुया की यावर नेटकरी काय म्हणाले आहेत. 

तिच्या या नथीवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकानं तिचा हा फोटो पाहून म्हटलंय, सुंदर तर एकानं लिहिलंय की, राधा. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. मध्यंतरी तिच्या वडिलांचीही चर्चा रंगलेली होती. त्यातून तिचे आडनाव कोणते? यावरही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यावरून बराच वादही सुरू झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेक राजकारण्यांनीही गौतमीवर टीका केली होती. तर काहींनी चक्क तिच्यावर भरपूर प्रमाणात टीका केली होती. अजूनही तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे गौतमी पाटील ही अनेकदा चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना काही घटनाही, राडेही घडताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते.