परीच्या ड्रेसमध्ये फोटोत बसलेली ही मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आणि गुगलच्या टॉप सर्चमध्ये असलेली ही स्टार तुम्हाला ओळखता येतेय का?

Updated: Jul 21, 2022, 02:49 PM IST
 परीच्या ड्रेसमध्ये फोटोत बसलेली ही मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्सचे अनेक फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत असतात. यातले काही फोटो जुनेही असतात. त्यामुळे जुन्या लहाणपणीच्या फोटोमध्ये हे स्टार्स अनेकदा ओळखता येत नाही. असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोतला स्टार्स ओळखण चाहत्यांना अवघड झालंय. त्यामुळे हा फोटो तुम्हाला ओळखता येतोय का पाहा.  

कोण आहे अभिनेत्री?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक लहान मुलगी पांढऱ्या रंगाच्या परीच्या ड्रेसमध्ये बसलेली दिसत आहे. तिच्यासोबत इतरही अनेक मुली दिसत आहेत. पण मध्येच बसलेली मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही मुलगी दुसरी कोणी नसून अभिनेत्री इलियाना डिक्रूज आहे.

इलियाना डिक्रूजने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2012 मध्ये रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रासोबत 'बर्फी' चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये इलियानाचा समावेश गुगलवर सर्वाधिक सर्चमध्ये केला जातो. 

अलीकडेच कतरिना कैफसोबत इलियाना डिक्रूझचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मालदीवमध्ये कतरिनाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये इलियाना उपस्थित होती.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, इलियाना डिक्रूज कतरिना कैफचा भाऊ सेबेस्टियनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहीती आहे. मात्र अद्याप यावर दोघांकडून कुठलीच प्रतिक्रिया समोर आली नाहीए.