Good News : राणादा-पाठकबाई पाठोपाठ 'देवमाणूस'ची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस ही मालिका फार कमी वेळातच खूप गाजली होती. यासोबतच या मालिकेतील प्रत्येक पात्रावरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. नुकताच या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या प्रेमाची कबूली दिली आहे.

Updated: Feb 1, 2024, 04:01 PM IST
Good News : राणादा-पाठकबाई पाठोपाठ 'देवमाणूस'ची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र title=

मुंबई : लागिर झालं जी' मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने भैयासाहेब नामक निगेटिव्ह भूमिका साकारली होती.  त्याची झी मराठी'वरील 'देवमाणूस'   ही मालिकाही प्रचंड गाजली होती. या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाडचाही फॅन हा मोठा आहे. आता नुकताच त्याचा 'चौक' हा चित्रपट प्रदर्शित झाला.  किरणने एखादी जरी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल होवू लागते. किरण चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किरण नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. 

नेहमी किरण  कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या पर्सनल आयुष्यात काय चालू हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना कायमच आवडतं. आता किरण एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.  खरंतर किरण गायकवाडने नुकतीच प्रेमाची कबूली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

देवमाणूस या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आले आहेत. 'देवमाणूस' या मालिकेचे दोन सिझन प्रसारित झाले होती. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. या मालिकेच्या दोन्ही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ही मालिका अल्पावधीच प्रचंड गाजली. या मालिकेनं जेव्हा प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा अनेकांना वाईट वाटलं होतं. मात्र आता याच मालिकेतील डिंपल आणि डॉक्टर खऱ्या आयुष्यात एकत्र आले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि किरण गायकवाड रिलेशनशिपमध्ये असल्याची कबूली त्यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून दिली आहे. नुकतीच किरणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ''ए फेब्रुवारी आहे आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का'' म्हणत किरणने हा फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट त्याने अस्मिता देशमुखला टॅग केली आहे. ही पोस्ट शेअर करताच युजर्सने त्याच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षावर करायला सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, डिंपल..... फायनली डॉक्टर फसला रे. तर अजून एकाने लिहीलंय, तुमच्या fans च सगळ्यात मोठ स्वप्न पूर्ण केल भैया साहेब ...तर अजून एकाने लिहीलंय, आयला एक नंबर तर अजून एकाने लिहीलंय, होऊन जाऊ दे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स चाहते या पोस्टवर करत आहेत. अवघ्या काही वेळातच ही पोस्ट व्हायरल होवू लागली आहे.