Fauji calling ला रिलीज होण्याआधी एक खास भेट. CM केजरीवाल म्हणाले -Thank You

 मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये या फौजी चित्रपटला टॅक्स फ्री करण्याचे घोषीत केले आहे.

Updated: Mar 2, 2021, 10:25 PM IST
 Fauji calling ला रिलीज होण्याआधी एक खास भेट. CM केजरीवाल म्हणाले -Thank You title=

मुंबई: शरमन जोशीचा आता नविन  चित्रपट फौजी कॉलिंग  येणार आहे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये या फौजी चित्रपटला टॅक्स फ्री करण्याचे घोषीत केले आहे. मात्र हा चि़त्रपटात शिपाईवर असणार आहे. ज्यामध्ये तो युद्धाच्या मैदानात असतो, त्यावेळी शिपाईच्या कुटुंबासोबत काय-काय घडतं या मुव्हीमध्ये पाहायला मिळेलं.

दिग्दर्शकाकडून दिल्ली सरकारचे आभार

विशेष म्हणजे या चि़त्रपटात शरमन सोबत बिदिता बाग, मुग्धा गोडसे, माही सोनी, जरीना महाब, शिशिर शर्मा आणि रांझा विक्रम सिंह पाहायला मिळणार आहेत. तसेच दिग्दर्शक आर्यन सक्सेना दिल्ली सरकारचे आभार व्यक्त करताना म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तुमचे मनापासून आभार."

फौजी कुटुंबांचा लपलेला चेहरा

भारतात काही राज्यांनी या फौजी चित्रपटाला टॅक्स फ्री न करता पूर्णपणे फ्री करण्याच घोषित केल आहे. ज्यामध्ये शिपाईच्या कुटुंबातील लपलेला चेहरा पाहायला मिळणार, तसेच या चित्रपटात कोणाच्याही भावनेला ठेच  लागणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. या मूव्हीचा दिग्दर्शक आर्यन शर्मा आहे. तर निर्माते नायद शेख, ओवेड शेख, विक्रम कुमार, अनिल जैन आणि विजीता वर्मा, तसेच विष्णु एस. उपाध्यक सह-निर्माता आहे

या दिवशी होणार रिलीज
फौजी मुव्ही 12 मार्चला रिलीज हाणार आहे. तसेच या मुव्हीचा ट्रेलर आणि पोस्टर रिलिज झालेला आहे. तर चाहत्यांकडून या मुव्हीला खूप प्रतिसाद मिळाला आहे.