फोटोत दिसणारा 'हा' मुलगा आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता, बॉलिवूडच्या अभिनेत्रींना आहे त्याचे वेड

हा अभिनेता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 

Updated: Aug 6, 2022, 01:48 PM IST
फोटोत दिसणारा 'हा' मुलगा आहे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता, बॉलिवूडच्या अभिनेत्रींना आहे त्याचे वेड title=

मुंबई : चित्रात दिसणारा हा मुलगा खूपच गोंडस आहे. हा मुलगा 33 वर्षांचा झाला आहे. या मुलाच्या क्यूटनेसवर चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना ही तो आवडतो. हा मुलगा टॉलिवूडचा हँडसम हंक आहे. हा मुलगा साऊथच्या चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी असला तरी बॉलिवूडमध्येही त्याच्या नावाची जोरदार चर्चा असते. अलीकडेच त्यानं करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) मध्येही हजेरी लावली होती. हा फोटो कोणाचा आहे हे तुम्हाला अजूनही ओळखता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला आणखी एक हिंट देतो. लवकरच या अभिनेत्याचा एक चित्रपट प्रदर्शित होत आहे ज्यामध्ये तो अभिनेत्री अनन्या पांडेसोबत (Ananya Panday)  दिसणार आहे. आता तुम्हाला समजलेच असेल की चित्रात दिसणारा हा मुलगा दुसरा कोणी नसून विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आहे.

अलीकडेच सारा अली खाननं (Sara Ali Khan) 'कॉफी विथ करण'मध्ये कबूल केले की तिला विजय देवरकोंडाला डेट करायचे आहे. बरं, विजयने तरुण वयातच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:साठी स्थान मिळवलं आहे. त्यानं आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विजय लवकरच बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. विजयने आपल्या करिअरची सुरुवात रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'नुव्विला'मधून केली होती. मात्र, 'येवेद सुब्रमण्यम' या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली. विजय या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत होता. यानंतर, 2016 मध्ये विजय 'पेली चोपुलु' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, विजय सध्या त्याचा 'लाइगर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'आफत' हे चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालं असून, ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. हा चित्रपट 25 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर आणि गाण्यांमधली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाल करणार हे पाहायला प्रेक्षक आतुर आहेत.