Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

बॉलिवूडमध्ये रोमान्सचा किंग नावाने ओळखला जातो, तुम्ही 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?   

Updated: Nov 20, 2022, 10:53 PM IST
Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा हा बालपणीचा फोटो आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखता येतोय का पाहा. 

फोटोत काय?

फोटोत दिसणारा हा मुलगा बॉलिवूडची (Bollywood) शान आहे. या मुलाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि बॉलिवूडचा सुपरस्टार देखील आहे. चाहत्यांनी त्याला अनेक नावे दिली, काहींनी त्याला किंग खान तर काहींनी त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हटले आहे.

'हा' आहे तो अभिनेता

जर तुम्ही अजुनपर्यंत या मुलाला ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah rukh Khan) बालपणीचा फोटो आहे. त्यांनी एक दशकभर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले आणि आजही त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते.

शाहरुख खानचा (Shah rukh Khan) लहानपणीचा हा फोटो आहे. शाहरुख खान लहानपणी त्याचा लहान मुलगा अबरामसारखा दिसत होता. त्याचा क्यूट फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.मात्र तरीही तो अनेकांना ओळखू आला नव्हता.