परदेशातही गाजणार 'गली बॉय'चं रॅप सॉन्ग

'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०१९'साठी 'गली बॉय'ची निवड

Updated: Jun 27, 2019, 02:52 PM IST
परदेशातही गाजणार 'गली बॉय'चं रॅप सॉन्ग title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर रणवीर सिंह आणि आलिया भट्ट स्टारर 'गली बॉय'ला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. २०१९च्या सुरुवातीलाच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. जोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'आता विदेशात जाण्यास सज्ज झाला आहे. 'गली बॉय'ची 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०१९'साठी निवड करण्यात आली आहे.

'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०१९' या फेस्टिवलचं हे १०वं वर्ष आहे. १०व्या मेलबर्न चित्रपटमहोत्सवात दिग्दर्शक जोया अख्तरचा गौरव करण्यात येणार आहे. तसंच चित्रपटही दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शक १० ऑगस्ट रोजी भारतीय चित्रपटांवर विस्तृत चर्चाही करणार आहे.

Box Office Collection: वीकेंड पर फिर 'गली बॉय' ने बनाया दबदबा, कमाई में आया 80.70% का उछाल

'भारतीय सिनेमांना सीमेबाहेर जाऊन प्रवास करताना पाहणं हा नेहमीच एक अभिमानास्पद अनुभव आहे. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून हा चांगला अनुभव आहेच आणि त्याही पुढे जाऊन भारतीय चित्रपटांचा असा उत्सव पाहणं ही भावनाच सुखद असल्याचं' जोया अख्तरने म्हटलंय.

'संस्कृतींचा मिलाप होणाऱ्या अशा चित्रपटमहोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी खुश आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये 'गली बॉय'चं स्पेशल स्क्रिनिंग पाहण्यासाठी आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांसोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचं' जोयाने म्हटलंय.

Film Review : बॉक्स ऑफिस पर हिट हुई 'गली बॉय', फैंस बोले- 'रणवीर सिंह का टाइम आ गया'

'गली बॉय'मध्ये एका रॅपरच्या जीवनातील संघर्षाचा काळ दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचं कथानकही स्ट्रिट रॅपर्सवर आधारित आहे. रणवीरने एका अशाच संघर्ष करणाऱ्या रॅपरची भूमिका तर आलियाने एका मुस्लिम कुटुंबातील मुलीची भूमिका साकारली आहे. 'गली बॉय'मधून आलिया आणि रणवीर ही जोडी पहिल्यांदाच चित्रपटातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आली.