movie review : हंपी

प्रकाश कुंटे दिग्दर्शित सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ता माळी यांच्या महत्वाच्या व्यक्तिरेखा असलेला हंपी हा सिनेमा आजपासून आपल्या भेटीला आलाय. कर्नाटकाच्या प्रसिद्ध आणि देखण्या हंपी या शहरात चित्रीत झालेल्या हंपी या सिनेमाची कथा आहे इशा आणि कबीर, या दोन तरुणांची, ज्या भूमिका साकारल्या आहेत सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर या जोडीनं.. पण या सिनेमाची गोष्ट केवळ दोघांची नसून, यात हंपी शहर, तिथलं सौंदर्य, ते वास्तव, तो इतिहास या सगळ्या गोष्टीं सिनेमाचा य़ूएसपी ठरतो.. 

Updated: Nov 17, 2017, 10:08 PM IST
movie review : हंपी  title=

मुंबई : प्रकाश कुंटे दिग्दर्शित सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्रियदर्शन जाधव आणि प्राजक्ता माळी यांच्या महत्वाच्या व्यक्तिरेखा असलेला हंपी हा सिनेमा आजपासून आपल्या भेटीला आलाय. कर्नाटकाच्या प्रसिद्ध आणि देखण्या हंपी या शहरात चित्रीत झालेल्या हंपी या सिनेमाची कथा आहे इशा आणि कबीर, या दोन तरुणांची, ज्या भूमिका साकारल्या आहेत सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर या जोडीनं.. पण या सिनेमाची गोष्ट केवळ दोघांची नसून, यात हंपी शहर, तिथलं सौंदर्य, ते वास्तव, तो इतिहास या सगळ्या गोष्टीं सिनेमाचा य़ूएसपी ठरतो.. 

इशा आणि कबीर दोघांची ओळख हंपीत होते. इशा आणि कबीरच्या व्यक्तिमत्वात मात्र जमीन आसमानाचा फरक.. इशा आपल्या खासगी समस्यांमध्ये इतकी गुंतलीये की आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींकडे तिचा एक नकारात्मक दृष्टीकोन झालाय. तर दुसरीकडे कबीर हा आपल्या दुनियेत मस्त असणारा, बिनधास्त जगणारा, नेहमी आनंदी राहणारा.. कबीर जेव्हा इशाला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो तेव्हा काय काय घडतं.. अशा लाईन्सवर जाणारा हंपी हा सिनेमा आहे.

दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या सिनेमाच्या कहाणी आणि ओव्हरओल थीम प्रमाणेच सिनेमाला ट्रीटमेन्ट दिलीये.. या सिनेमाचं सादरीकरण खूपच हटके पद्धतीनं करण्यात आलं.. कधी कधी केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर एखाद्या वास्तूच्याही प्रेमात पडता येतं.. त्या वास्तूसोबत एक वेगळंच नातं जोडलं जातं.. त्या वास्तूला सोडावंसं वाटत नाही.. अशीच एक वन लाईनर या सिनेमातही आहे.. 

या सिनेमाची खासियत म्हाणजे यातली सिनेमाटॉग्रफी आणि संगीत.. हा कमर्शियल सिनेमा असला तरी हा मसालापट नाही.. हंपीची वेगळीच सफर घडवणा-या या सिनेमाची कथा पटकथा आणि संवाद अदिती मोघे यांची आहे. हंपी हा एक ऑलटूगेदर वेगला प्रयोग आहे जो लेखिका अदिती मोघे आणि दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी पद्यावर सादर केलाय. या सिनेमाचा एक वेगळा ऑडियन्स असल्यामुळे याचा फायदा सिनेमाला कितपत होतो याबाबत शंका वाटते.. हंपी या सिनेमातील हे सगळे फॅक्ट्स पाहता या सिनेमाला मिळतायत 3 स्टार्स.